बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 3, 2016 02:48 IST2016-08-03T02:48:55+5:302016-08-03T02:48:55+5:30

जलाशयात पोहोण्यास गेलेल्या श्रीवर्धनमधीलच दांडा कोळीवाड्यातील पाचपैकी दोघा तरुणांचा मंगळवारी दुपारी तीन वाजता बुडून मृत्यू झाला

Due to the death of both of them drowned in the manger | बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू

बंधाऱ्यात बुडून दोघांचा मृत्यू


अलिबाग : श्रीवर्धन शहरापासून जवळच असलेल्या सायगाव येथील धरण बंधाऱ्याच्या जलाशयात पोहोण्यास गेलेल्या श्रीवर्धनमधीलच दांडा कोळीवाड्यातील पाचपैकी दोघा तरुणांचा मंगळवारी दुपारी तीन वाजता बुडून मृत्यू झाला आहे. दोघा मृत तरुणांची नावे गणेश भारत चोगले (२२) व साजन दिलीप जाधव (२३) अशी असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
दांडा कोळीवाडा येथील एकूण ९ तरुण सकाळी सायगावजवळच्या मंदिरात गेले होते, तेथून परत येत असताना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यापैकी पाच तरुण सायगावच्या धरण बंधाऱ्यात पोहायला गेले. येथे चिखल व दाट झाडी असल्याने पाण्याचा वाहता प्रवाह नाही. त्यातच या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. सोबतचे तिघे मात्र बचावले आहेत. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधून काढले. (वार्ताहर)

Web Title: Due to the death of both of them drowned in the manger