वसईत फलाट कोसळल्याने प्रवासी थेट गटारात पडले
By Admin | Updated: May 31, 2016 10:31 IST2016-05-31T10:19:21+5:302016-05-31T10:31:07+5:30
वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकचा काही भाग मंगळवारी कोसळला. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

वसईत फलाट कोसळल्याने प्रवासी थेट गटारात पडले
ऑनलाइन लोकमत
विरार, दि. ३१ - वसई रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकचा काही भाग मंगळवारी कोसळला. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. प्लॅटफॉर्मच्या खाली गटार असल्याने प्रवासी थेट गटारात पडले.
जवळपास १५ प्रवासी या घटनेत जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. वसई स्थाकात प्रवाशांची एकच गर्दी झाल्याने अचानक जिन्याला लागून असलेला फलाट क्रमांक एकचा काही भाग कोसळला. यावेळी इतर सहप्रवाशांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले.