शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षिकेचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: June 15, 2016 15:46 IST2016-06-15T11:38:54+5:302016-06-15T15:46:21+5:30
शाळेच्या पहिल्याच दिवशी मोटरसायकवरून शाळेत जाणा-या शिक्षक पती पत्नीच्या दुचाकीला अपघात होऊन शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली.

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षिकेचा अपघातात मृत्यू
उपरी (पंढरपूर), दि. १५ - शाळेच्या पहिल्याच दिवशी मोटरसायकवरून शाळेत जाणा-या शिक्षक पती पत्नीच्या दुचाकीला अपघात होऊन शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूरमधील वाखरी येथे घडली.
आज प्राथमिक शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे बाळासाहेब पवार व वर्षा पवार हे शिक्षक पती पत्नी दुचाकीवरून शाळेत जात असताना त्यांच्या गाडीला बोलेरो जीपने धडक दिली. या अपघातात वर्षा पवार यांचा मृत्यू झाला तर बाळासाहेब पवार हे गंभीर जखमी झाले. शाळेच्या पहिल्या दिवशीच हा अपघात होऊन शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.