दुहेरी मार्गाचा प्रस्ताव सादर
By Admin | Updated: November 24, 2014 03:36 IST2014-11-24T03:36:43+5:302014-11-24T03:36:43+5:30
दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे दुहेरी मार्गाचा प्रश्न सुटावा,

दुहेरी मार्गाचा प्रस्ताव सादर
मुंबई : दुहेरी मार्ग नसल्याने कोकण रेल्वे प्रशासनाला आणि प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे दुहेरी मार्गाचा प्रश्न सुटावा, यासाठी कोकण रेल्वेकडून तयार करण्यात आलेला दुहेरी मार्गाचा प्रस्ताव मागील आठवड्यात रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.
मध्य आणि कोकण रेल्वेमार्गावर एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास दोन्ही रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प होतात. त्यामुळे दुहेरी मार्ग असावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात असून, मध्य आणि कोकण रेल्वेकडून तसे प्रयत्नही केले जात आहेत. मध्य रेल्वेकडून पेण ते कासू आणि कासू ते रोहापर्यंतचे काम हाती घेण्यात आले असून, हे काम लवकरच पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मात्र कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरणाचा प्रकल्प अजूनही मार्गी लागलेला नसून, त्याचा फक्त प्रस्ताव तयार करण्यात आला होता. कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, रोहा ते करंजाडी आणि बैंदूर ते ठोकूर असे टप्प्याटप्प्यात दुहेरीकरण करण्याचे प्रस्तावात नमूद आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १,५00 कोटी रुपयांचा खर्च आहे. याबाबत कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांना विचारले असता, दुहेरीकरणाचा प्रस्ताव मागील आठवड्यात रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता फक्त मंजुरीची प्रतीक्षा करण्यात येत असून त्याला लवकरच मंजुरीही मिळेल, असे त्यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)