मद्यधुंद पित्याने अडीच वर्षांच्या चिमुरड्याला दिले चटके!

By Admin | Updated: August 28, 2016 20:05 IST2016-08-28T20:05:42+5:302016-08-28T20:05:42+5:30

पित्याने दारूच्या नशेत स्वत:च्याच अडीच वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण करून त्याला चुलीतील पेटत्या लाकडाचे चटके दिले.

Drunk father gave two-and-a-half year old chicks! | मद्यधुंद पित्याने अडीच वर्षांच्या चिमुरड्याला दिले चटके!

मद्यधुंद पित्याने अडीच वर्षांच्या चिमुरड्याला दिले चटके!

सुमित हरकुट/ऑनलाइन लोकमत

चांदूरबाजार, दि. 28 - तालुक्यातील निमखेड येथील एका मद्यधुंद पित्याने दारूच्या नशेत स्वत:च्याच अडीच वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण करून त्याला चुलीतील पेटत्या लाकडाचे चटके दिले. जीवाच्या आकांताने या क्रूर प्रकाराचा विरोध करणाऱ्या पत्नीलाही त्याने बेदम मारहाण केली. मुलाच्या वेदनांनी गलबललेल्या मातेने दुसऱ्या दिवशी नवऱ्याची नजर चुकवून त्याला खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणले असता स्थानिक खासगी डॉक्टरांच्या निदर्शनास हा प्रकार आला. अखेर डॉक्टरांच्या पुढाकारानेच या अमानवीय कृत्याची तक्रार ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. नीलेश खाडे असे या क्रूरकर्मा पित्याचे नाव आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंधातून विवाह बंधनात अडकलेल्या किरण व नीलेश खाडे यांना नैतिक नामक अडीच वर्षांचा चिमुरडा आहे. मात्र, मजुरीचे काम करणाऱ्या नीलेशला दारुचे व्यसन जडल्याने तो पत्नी व मुलाला दररोज मारहाण करीत होता. मात्र, शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील नीलेश याने मुलाला पाणी आणण्यास सांगितले. घाबरलेल्या चिमुरड्याच्या हातून पाण्याचा पेला खाली पडला. या क्षुल्लक कारणावरून नीलेशने त्याला जबर मारहाण केली व चुलीवरील गरम भाजी त्याच्या अंगावर फेकली. इतक्यावरच त्याचे समाधान झाले नाही तर त्याने तसेच चुलीतील जळत्या लाकडाचे चटकेदेखील दिले. या अमानवीय कृत्याचा विरोध करणाऱ्या पत्नीलाही त्याने बेदम मारहाण केली. मुलाच्या वेदना पाहावत नसल्याने रविवारी दुपारी १ वाजता नीलेशची नजर चुकवून किरणने मुलाला चांदूरबाजार येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता आणले. मात्र, तिच्या मागावरच असलेला नीलेशसुद्धा रुग्णालयात पोहोचला. उपचार करताना डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली असता त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी मुलाच्या आईला वारंवार विचारणा केली असता ती ढसाढसा रडू लागली आणि तिने सर्व हकीकत डॉक्टरांसमोर कथन केली. हा अमानवीय प्रकार पाहून डॉक्टरदेखील हादरून गेले. त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला फोनवरून हकीकत सांगितली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस रूग्णालयात धडकले व नीलेश खाडे याला ताब्यात घेतले. ही घटना ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने डॉक्टरांनी महिला व चिमुरड्याला सोबत घेऊन ब्राम्हणवाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बॉक्स डॉक्टरांची सतर्कता डॉ. हेमंत रावळेच्या सतर्कतेमुळे पीडित महिलेसह व अडीच वर्षीय बालकावरील अत्याचार उघड झाले. पतीचे अत्याचार निमुटपणे सहन करणाऱ्या या मातेने अखेर मौन सोडले. याप्रकरणात डॉ. हेमंत रावळे यांनी दाखविलेली मानवता आणि घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

Web Title: Drunk father gave two-and-a-half year old chicks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.