ड्रंक अँड ड्राइव्ह, मुंबईत ५३९, ठाण्यात ७७५ तळीरामांवर कारवाई
By Admin | Updated: January 1, 2016 12:39 IST2016-01-01T10:40:22+5:302016-01-01T12:39:28+5:30
नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना रस्ते अपघातात कोणाला जीव गमवावा लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही ड्रिंक अँड ड्राइव्हची विशेष मोहिम राबवली.

ड्रंक अँड ड्राइव्ह, मुंबईत ५३९, ठाण्यात ७७५ तळीरामांवर कारवाई
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना रस्ते अपघातात कोणाला जीव गमवावा लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही ड्रंक अँड ड्राइव्हची विशेष मोहिम राबवली.
मुंबईत ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेतंर्गत ५३९ तळीरामांवर कारवाई करण्यात आली. पुण्यात ३५३, नागपूरात २५५ आणि ठाण्यामध्ये सर्वाधिक ७७५ जणांवर कारवाई करण्यात आली. ठाण्यात एका मद्यपीने दंड आकारला म्हणून रागाच्या भरात स्वत:ची नवी कोरी दुचाकी जाळली.
मद्यपान करुन वाहन चालवल्यामुळे होणारे अपघात रोखणे हे या मोहिमेमागचे मुख्य उद्दिष्ट होते. दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री संपूर्ण राज्यभरात वाहतूक पोलिस ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिम राबवतात. अनेकजण मद्यपान करुन नव्या वर्षाचे स्वागत करतात.