पालखी सोहळ्यासाठी औषधे
By Admin | Updated: June 28, 2016 01:51 IST2016-06-28T01:51:43+5:302016-06-28T01:51:43+5:30
वारीला जाऊन येईपर्यंत सतत औषधोपचार सेवा देणाऱ्या विश्व हिंदू परिषद या संस्थेला वारकऱ्यांसाठी लागणारी औषधे देण्यात आली.

पालखी सोहळ्यासाठी औषधे
चिंचवड : पंढरपूर वारी पायी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वारीला जाऊन येईपर्यंत सतत औषधोपचार सेवा देणाऱ्या विश्व हिंदू परिषद या संस्थेला वारकऱ्यांसाठी लागणारी औषधे देण्यात आली.
मधुकर बच्चे युवा मंच, चिंचवडचे चैतन्य मेडिको, भाजपा केशवनगर चिंचवड विभाग व कर्तव्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्या हस्ते ती देण्यात आली. या वेळी भाजपाचे मधुकर बच्चे, युवा प्रभाग अध्यक्ष सौरभ शिंदे, भाजपा महिला प्रभाग अध्यक्ष रोहिणी बच्चे, सरचिटणीस सुषमा कोरे, तन्वी जाधव, ज्योती जगताप, राजेश्री जाधव, रेखा जाजू, वर्षा शेम्बेकर, गणेश बच्चे, जय वानखेडे, महेश तेलंगे, जान्हवी खेडेकर, प्रवीण ढवळे, जय वानखेडे आदी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषेदेचे अरविंद पिटके, भास्कर गोडबोले, विठ्ठल जाधव या पदाधिकाऱ्यांकडे औषधे सुपूर्त केली. मारुती हाके, बबन बच्चे, केमिस्ट बांधवानी औषधरुपी मदत करून विशेष सहकार्य केले. (वार्ताहर)