पुण्यात औषध विक्रेत्यांचा बंद मागे
By Admin | Updated: June 29, 2014 01:28 IST2014-06-29T01:28:06+5:302014-06-29T01:28:06+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. महापौरांच्या शिष्टाईमुळे औषध विक्रेत्यांनी शनिवारी बंद मागे घेतला.

पुण्यात औषध विक्रेत्यांचा बंद मागे
>पुणो : शहरातील औषध विक्रेत्यांच्या बंदमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ लागली. त्यामुळे महापौर चंचला कोद्रे यांनी औषध विकेते असोसिएशनबरोबर चर्चा करून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. महापौरांच्या शिष्टाईमुळे औषध विक्रेत्यांनी शनिवारी बंद मागे घेतला.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने 3क्क् औषध विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यामुळे पुणो जिल्हा केमिस्ट असोसिएशनने बेमुदत बंद पुकारला होता. शहर व जिल्ह्यातील औषध दुकाने बंद असल्याने नागरिकांची व रुग्णांची परवड होऊ लागली. अखेर महापौर कोद्रे व शहर युवक अध्यक्ष अजित बाबर यांनी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ शिंदे यांच्याशी शनिवारी चर्चा केली. त्या वेळी उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन त्यावर तोडगा करण्याविषयी चर्चा झाली. त्यानंतर असोसिएशनने बंद मागे घेतल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)