दुष्काळी सोलापूरात झाली पाण्याची अशी नासाडी
By Admin | Updated: February 5, 2016 16:09 IST2016-02-05T15:53:53+5:302016-02-05T16:09:46+5:30
सोलापूरपासून अवघ्या २५ किलोमीटरवर असलेल्या लांबोटी येथे जलवाहिनी फुटल्यामुळे अक्षरश: लाखो लिटर पाणी फुकट गेलं आहे.

दुष्काळी सोलापूरात झाली पाण्याची अशी नासाडी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ५ - सोलापूरपासून अवघ्या २५ किलोमीटरवर असलेल्या लांबोटी येथे जलवाहिनी फुटल्यामुळे अक्षरश: लाखो लिटर पाणी फुकट गेलं आहे. प्रचंड दुष्काळाचा सामना करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पाण्याची अशी नासाडी होताना पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूरची ओळख रब्बीचा जिल्हा अशी आहे. सर्वाधिक ज्वारीचं उत्पन्न घेणारा हा जिल्हा यंदा भीषण दुष्काळाच्या सावटात आला असून ५० वर्षांत प्रथमच दुष्काळ जाहीर करण्यापर्यंत पोचला आहे. असं असताना पाण्याचा एकेक थेंब जपून वापरावा अशी अपेक्षा असताना जलवाहिनी फुटण्यासारख्या व त्याद्वारे पाण्याचा प्रचंड अपव्यय होताना बघणे क्लेषदायी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.