मराठवाड्यातील ‘ड्रायपोर्ट’ ठरणार विकासाचा लोहमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:29+5:302015-12-05T09:07:29+5:30

जालन्याजवळील दरेगाव येथे होणाऱ्या ‘ड्रायपोर्ट’च्या घोषणेनंतर वर्षभरातच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. दरेगाव ते जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी)

'Drought' in Marathwada will lead to development road | मराठवाड्यातील ‘ड्रायपोर्ट’ ठरणार विकासाचा लोहमार्ग

मराठवाड्यातील ‘ड्रायपोर्ट’ ठरणार विकासाचा लोहमार्ग

- संजय देशपांडे,  औरंगाबाद
जालन्याजवळील दरेगाव येथे होणाऱ्या ‘ड्रायपोर्ट’च्या घोषणेनंतर वर्षभरातच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. दरेगाव ते जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी ३०० किमीचा स्वतंत्र लोहमार्ग उभारला जाणार आहे. त्यामुळे माल वाहतुकीवरील खर्च कमी होणार आहे. हा ड्रायपोर्ट म्हणजे विकासाचा नवा लोहमार्गच ठरणार असल्याचे उद्योगजगतात बोलले जात आहे.
मराठवाड्याच्या विकास प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरने (सीएमआयए) ७ आॅगस्ट २०१४ रोजी दिल्लीत एका बैठकीचे आयोजन
केले होते. या बैठकीत केंद्रीय
भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मालवाहतुकीसाठी जालन्याजवळ ड्रायपोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली होती. येत्या २५ डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.
दररोज ३०० कंटेनर
औरंगाबादहून मालवाहतूक करण्यासाठी सध्या रस्ते मार्गाचा वापर केला जातो. विविध कंपन्यांचा सुमारे ३०० कंटेनर माल दररोज ‘जेएनपीटी’ पर्यंत जात असतो. एका कंटेनरच्या वाहतुकीसाठी २५ ते ३० हजारांचा खर्च येतो. त्यासाठी लोहमार्गाचा वापर केल्यास ८ ते १० हजार रुपयांतच हे कंटेनर ‘जेएनपीटी’पर्यंत पोहोचू शकतात.

जमिनीवरील बंदर
ड्रायपोर्ट म्हणजे जमिनीवरील बंदरच. समुद्रातील बंदराप्रमाणे याठिकाणी कस्टम क्लिअरन्स, कंटेनर यार्ड, कंटेनर लिफ्टिंग, ट्रक टर्मिनस आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मराठवाड्यात सध्या एकेरी लोहमार्ग आहे. त्यावर प्रवासी वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. ड्रायपोर्टमुळे या मार्गावरील मालवाहतुकीचा ताण कमी होईल. मालवाहतुकीचा नवीन मार्ग टाकण्यासाठी रेल्वेकडे निधी नसल्याने ड्रायपोर्टची कल्पना पुढे आली.

Web Title: 'Drought' in Marathwada will lead to development road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.