मोखाडा बसस्थानकात सुविधांचाच दुष्काळ
By Admin | Updated: May 30, 2016 02:40 IST2016-05-30T02:40:53+5:302016-05-30T02:40:53+5:30
चाळीशी पार करणाऱ्या येथील बसस्थानकात स्वच्छतागृहापासून ते प्रतिक्षालयापर्यंत सर्वच सुविधांचा दुष्काळ आहे.

मोखाडा बसस्थानकात सुविधांचाच दुष्काळ
रवींद्र साळवे,
मोखाडा- चाळीशी पार करणाऱ्या येथील बसस्थानकात स्वच्छतागृहापासून ते प्रतिक्षालयापर्यंत सर्वच सुविधांचा दुष्काळ आहे.
मोखाडा बसस्थानक हे ३५ ते ४० वर्षा पूर्वीचे जुने असून मध्यंतरीच्या काळात फक्त या जुनाट इमारतीचे थातूरमातूर काम करण्यात आले आहे या बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही उद्घोषण यंत्रणा नाही प्रवाशांना ये जा करणाऱ्या गाड्यांची माहीत मिळावी यासाठी वेळापत्रक नाही यामुळे निरक्षर व खेडोपाड्यातुन येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडते व बसण्यासाठी जागेची कमतरता असल्याने प्रवाशांना लगतच्या दुकानाच्या आडोशाला उभे राहावे लागते परंतु पावसाळ्यात मोठी गैरसोय होते व या बसस्थानकाच्या आवारात असलेल्या एकमेव प्रसाधनगृहाचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने लाखो खर्च करु न नूतनीकरण केले. परंतु त्याचा उपयोग नागरिकांना होत नाही कारण त्याच्या स्वच्छतेची काळजी कुणीही घेत नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीच्य साम्राज्य पसरले आहे व याकडे मोखाडा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असून यामुळे महिला वर्ग व चाकारमान्याची गैरसोय होत आहे फरक एवढाच हे प्रसाधनगृह आगोेदर बंद होते आणि आता खुले करण्यात आले आहे. तसेच या बसस्थानकातून नाशिक पालघर कसारा घोटी व खेडोपाड्यातुन तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा असून प्रवाशांची मोठी वर्दळ नेहमीच असते. (वार्ताहर)