शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:26 IST

५४ टक्के पावसाची तूट जलसाठे अद्याप कोरडे, पेरण्यांवरही संक्रांत

रूपेश उत्तरवार यवतमाळ/मुंबई : जुलै संपत आला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यातील २४ जिल्ह्यांवर भीषण दुष्काळाचे संकट येण्याची परिस्थिती आहे. ३५५ तालुक्यांपैकी ४१ तालुक्यात केवळ ४० टक्के तर १५४ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात जलसंकट ओढावले आहे.

यंदा सरासरीएवढा पाऊस होईल, हा हवामान खात्याचा अंदाज वरुणराजाने साफ खोटा ठरवला. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैकडे शेतकऱ्यांनी आशा लावली होती, मात्र या महिन्यात किरकोळ सरी बरसवून पाऊस ढगातच दडून बसला. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरलीच नाही. खरीप पिकांचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून २२ जुलैपर्यंत १०९.८२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असा कृषी खात्याचा दावा आहे. मात्र पावसाची आकडेवारी पाहाता हा दावा कितपत खरा आहे, याविषयी साशंकता आहे.

मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद वगळता सहा जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि नंदुरबार तर विदर्भातील वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत सरासरीच्या ४० ते ५० टक्केच पाऊस झाला आहे. या जिल्ह्यांमध्ये ५४ टक्के पावसाची तूट आहे.

आता उशिरा पाऊस बरसला तरी कपाशी, सोयाबीन या मुख्य पिकांऐवजी शेतकºयांना मका, तूर अशा दुय्यम पिकांची पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतीवरच अवलंबून असलेल्या शेतकºयांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

आठ दिवसांनी खरीप कर्जवितरण थांबणारदुष्काळी स्थितीने कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकºयांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याचा आदेश काढून सरकारने तो राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठविला. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा कर्ज पुनर्रचनेस तयार नाहीत. तशा तक्रारी शेतकºयांनी संबंधित जिल्हाधिकाºयांकडे केल्या. आता खरीप कर्जवितरणासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कर्जवितरण थांबणार आहे. तथापि राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज वितरण अद्यापही ३० टक्क्यांपेक्षा पुढे सरकले नाही. यामुळे पुढील आठ दिवसांत उर्वरित कर्ज वितरण होईल काय, असा प्रश्न आहे.

१३०० शेतकºयांच्या आत्महत्या : नापिकी व दुष्काळी स्थितीमुळे ६ महिन्यांत १३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. अमरावती विभागात ४६३ तर औरंगाबाद विभागात ४३४ आत्महत्या झाल्या. बुलडाणा १३४, अमरावती १२२, यवतमाळ ११३, बीड ९६, अहमदनगर ७१, उस्मानाबाद ६६, तर औरंगाबाद ६३ अशी आत्महत्यांची नोंद आहे.

टॅग्स :droughtदुष्काळRainपाऊस