शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात आकाशात ड्राेनसदृश वस्तू दिसल्याने घबराट, प्रशासकीय पातळीवर खात्री करण्याच्या हालचाली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 23:24 IST

Parbhani News: पाकिस्तान-भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ड्राेनसदृश उपकरणे एका रांगेत आकाशात उडत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे चित्र अनेक गावांमध्ये दिसून आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.

- विजय पाटीलपरभणी - पाकिस्तान-भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ड्राेनसदृश उपकरणे एका रांगेत आकाशात उडत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे चित्र अनेक गावांमध्ये दिसून आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.

भारत-पाकिस्तान तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ९ मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे, तांडा पिंपळगाव, येलदरी यासह ग्रामीण भागातील अनेक गावांत ड्राेनसदृश उपकरणे आकाशामध्ये दिसून आली. गावातील लोकांनी यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर वरिष्ठांना कळविले आहे. १७ ते १८ हे ड्राेन असावेत, असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस व महसूल प्रशासनाला गावातील पोलिस पाटील व इतरांनी तातडीने कळविले. भीतीपोटी काही ठिकाणचे ग्रामस्थ एकत्रित जमले होते. प्रशासकीय पातळीवर नेमके ड्राेन कशाचे होते, याबाबत फारशी माहिती नसल्याने नागरिकांत संभ्रमावस्था दिसत हाेती.

होय मलाही फोन आले- तहसीलदारयासंदर्भात तहसीलदार राजेश सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला ग्रामीण भागातून अनेक गावांतून फोन आले आहेत. नेमके हे ड्राेन कशा पद्धतीचे होते किंवा इतर काही वस्तू होती का, याची खात्री करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.स्टारलिंक सॅटेलाईट असू शकतात-पोलिस अधीक्षक

नागरिकांनी आकाशात जे पाहिले ते नेमके काय आहे, हे सांगता येत नाही. मात्र स्टार लिंक सॅटेलाइट असू शकतात. घाबरण्याचे कारण नाही. माहिती घेत आहोत, असे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.फ्रांसमध्येही दिसले होते सॅटेलाईट

फ्रांस व स्पेनमध्येही अशाप्रकारचे स्टारलिंक सॅटेलाईट दिसले होते. ‘बीबीसी’ने तसे वृत्त दिलेले आहे. ते एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे आहेत. जिंतूर व सेलू तालुक्यात तसेच चित्र दिसले. हे स्टारलिंक सॅटेलाईट पृथ्वीभोवती फिरतात. त्यामुळे हे स्टारलिंक सॅटेलाईट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीMaharashtraमहाराष्ट्र