चालकांचा हलगर्जीपणा ; दोन बसची धडक, 11 जण जखमी
By Admin | Updated: August 28, 2016 22:25 IST2016-08-28T22:25:12+5:302016-08-28T22:25:12+5:30
दोन चालकांच्या हलगर्जीपणामुळे एस.टी.ची धडक होऊन ११ प्रवासी जखमी झाले.

चालकांचा हलगर्जीपणा ; दोन बसची धडक, 11 जण जखमी
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 28 - दोन चालकांच्या हलगर्जीपणामुळे एसटीची धडक होऊन ११ प्रवासी जखमी झाले. ही घटना पंढरपूर डेपोत घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
रविवारी (क्र. एम.एच.१२/ई.ए. ६३८८) पंढरपूर-तनाळी व (क्र. एम.एच.0७/सी. ७१५६) सोलापूर-कराड या दोन एसी डेपोत प्रवेश करण्यासाठी दाखल झाल्या. यावेळी दोन्ही एसटी चालकामध्ये पुढे जाण्याची घाई लागली होती. यातूनच सोलापूर-कराड बसची पंढरपूर-तनाळी मसला धडक बसली. यामुळे तनाळी बसमधील ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून विना तिकीट मुक्कामाच्या ठिकाणी सोडण्यात आले. यासह जखमी प्रवाशांना प्रत्येकी ५०० रूपयाची आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे.
या अपघातामध्ये दोन्ही बसचे ३० व २५ हजार असे एकूण ५५ हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. बसस्थानकातच हा प्रकार घडल्यामुळे इतर प्रवाशी देखील घाबरले होते. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचा गैरसमज झाला होता. पण चालकांच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना फटका बसला. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.