डंपरखाली दबल्याने चालकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 16, 2014 01:38 IST2014-05-16T01:38:57+5:302014-05-16T01:38:57+5:30

पारोळा : डंपरखाली दबल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी विचखेडे गावानजीक झाली.

Driver's death by suppressing under the dumper | डंपरखाली दबल्याने चालकाचा मृत्यू

डंपरखाली दबल्याने चालकाचा मृत्यू

 पारोळा : डंपरखाली दबल्याने चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी विचखेडे गावानजीक झाली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती. वाळूने भरलेला डंपर (एमएच १४/ सीपी १९५६१) पारोळ्याकडून धुळ्याकडे जात होता. डंपरचे चाक पंक्चर झाल्याने ते बदलविण्यासाठीे चालक नानाभाऊ झामरू पाटील (३५, रा.वारकुंडाणे, ता.जि. धुळे, ह.मु. साक्री रोड) याने डंपरला जॅक लावला. मात्र जास्त वजनामुळे डंपर जॅकवरून खाली आल्याने त्यात चालक दाबला गेला. विचखेडे येथील विजय निकम यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने चालकाला डंपरखालून काढले. त्यास तातडीने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. डॉ.राहुल लुणावत, डॉ.सुरेश पाटील यांनी त्यावर उपचार केले. मात्र त्याचा श्वास कोंडला गेला व पोटात जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी काढला. त्याच्या नातेवाइकांना या अपघाताची माहिती कळविण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)

Web Title: Driver's death by suppressing under the dumper