चालकाने एस. टी. बस पुराच्या पाण्यात घातली अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 21:39 IST2017-07-18T21:08:40+5:302017-07-18T21:39:00+5:30
खेड दापोली मार्गावर खेड शहरानजीक एकविरानगर येथे नारंगीनदीच्या पुराचे पाणी भरल्यानंतर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे

चालकाने एस. टी. बस पुराच्या पाण्यात घातली अन्...
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 18 - खेड दापोली मार्गावर खेड शहरानजीक एकविरानगर येथे नारंगीनदीच्या पुराचे पाणी भरल्यानंतर या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. लहान वाहने पर्यायी मार्गाने जात होती तर मोठी वाहने रस्त्यात रांगेत उभी होती मात्र दापोलीहून खेडकडे येणाऱ्या एका एस. टी. चालकाने अतिउत्साह दाखवत रस्त्यावरून पाच फुटांपेक्षा अधिक पाणी वाहत असताना त्या पुराच्या पाण्यात एस.ती.बस घातली आणि मधोमध जाताच एस. टी. बस बंद पडली. सुदैवाने त्या बसमध्ये काही मोजकेच प्रवासी होते. ते छातीइतक्या पाण्यातून सुखरूप बाहेर पडले. पुराच्या पाण्यात मधोमध बंद पडलेली बस तेथे जमलेल्या काही धाडसी तरुणांनी धक्के मारून बाहेर काढली.