टाकावू बाटल्यांव्दारे ठिबक सिंचन
By Admin | Updated: July 5, 2014 23:43 IST2014-07-05T22:34:59+5:302014-07-05T23:43:56+5:30
टाकावू सलाईन व बिसलरी बाटल्यांचा उपयोग करून ठिबक सिंचनाव्दारे झाडांना पाणी घालून थेंब-थेंब पाण्याचे नियोजन व संवर्धनाचा संदेश दिला.

टाकावू बाटल्यांव्दारे ठिबक सिंचन
बुलडाणा : शरद पवार हायस्कूल पांगरी शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेने टाकावू सलाईन व बिसलरी बाटल्यांचा उपयोग करून ठिबक सिंचनाव्दारे झाडांना पाणी घालून थेंब-थेंब पाण्याचे नियोजन व संवर्धनाचा संदेश दिला.
अध्यक्ष प्रा.उबरहंडे, उपसंचालक प्रकाश लोणकर, प्राचार्य रविंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव उपक्रमाचे आयोजन हरित सेनाप्रमुख संजय राजपूत यांनी केले. पाण्याची तीव्र टंचाईवर मात करीत टाकावू सलाईन, बिसलरी किंवा थंड पेयाच्या बाटल्यांचा उपयोग करून झाडांना थेंब-थेंब पाण्याच्या साहाय्याने झाडाचे संवर्धन केले. हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी मोठय़ा उत्साहाने या अभिनव उपक्रमाला साथ देत झाडांना जीवनदान देत एक संवर्धनाचा आदर्श जनतेसमोर ठेवला.
तसेच पाण्याच्या टाकीजवळ विद्यार्थी हात धुतात, पाणी पितात, डब्बे धुतात या पाण्याचा पुनर्वापर शाळेसमोरील झाउे व मेहंदीला केला जातो. त्यामुळे झाउे व मेहंदी हिरवीगार झालेली आहे. याबद्दल संस्था अध्यक्ष प्रा.भिमराव उबरहंडे, लागवड अधिकारी एस.टी.फड, पर्यवेक्षक गजानन पवार यांनी कौतुक केले. या उपक्रमात हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.