शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दूध प्या बिनधास्त, लम्पी रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही; आरोग्यतज्ज्ञांचे मत

By संतोष आंधळे | Updated: September 14, 2022 07:11 IST

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १२ सप्टेंबरपर्यंत २,२६४ पशुधनाला लम्पी स्किन आजाराची बाधा झाली असून ४३ जनावरे या आजाराचा बळी ठरली आहेत

मुंबई : पाळीव जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा आजार बळावत चालल्याने गायीचे दूध प्यावे की, नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, घरी आलेले दूध उकळून प्यायल्यास या आजाराच्या फैलावाचा कोणताही धोका संभवत नसल्याचा निर्वाळा पशुवैद्यक तज्ज्ञांनी दिला आहे. लम्पी आजाराबाबत लोकांनी बाऊ न करता सावधगिरी बाळगावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, या आजारामुळे नजीकच्या काळात दुधाचे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १२ सप्टेंबरपर्यंत २,२६४ पशुधनाला लम्पी स्किन आजाराची बाधा झाली असून ४३ जनावरे या आजाराचा बळी ठरली आहेत. लम्पी हा विषाणूजन्य त्वचारोग आहे. विशेष म्हणजे बाधित जनावरांकडून दुसऱ्या जनावराला हा आजार होऊ शकतो. 

मानवामध्ये संक्रमित होण्याचा धोका नाहीपॅकबंद दूध पाश्चराइज्ड असते. ते डेअरीमध्ये उच्च तापमानावर तापविले जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये विषाणू असण्याचा प्रश्नच नाही. तबेल्यातून थेट दूध घरी येत असेल तर ते मोठ्या प्रमाणात उकळून प्यावे. त्यामुळे दूध पिण्यातून कोणताही धोका संभवत नाही. हा आजार जनावरांमधून मानवामध्ये संक्रमित झालेला नाही, किंवा तसे कुठे आढळून आलेले नाही. - डॉ. राजीव गायकवाड, औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय

...तर दूध उत्पादन घटण्याची शक्यता आजच्या घडीला आजाराचे प्रमाण कमी आहे. मात्र, फैलाव होत आहे. आम्ही २० दिवस आधीच जनावरांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आमच्याकडे दररोज ५ लाख ७५ हजार लिटर दूध येते. त्यात आजपर्यंत घट नाही. पण नजीकच्या काळात आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - मोहन येडूरकर, एमडी, वारणा सह. दूध उत्पादक संघ

विषाणू दुधात टिकाव धरत नाहीतलम्पी त्वचाराेग दुधावाटे माणसांमध्ये पसरण्याच्या धास्तीने अकाेलेकरांनी गायीच्या दुधाकडे पाठ फिरवली आहे. गायीच्या पिशवीबंद दुधाच्या विक्रीत घट आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. लम्पी आजाराचा विषाणू दुधात टिकाव धरत नसल्यामुळे दुधापासून काेणताही धाेका नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

आजारी जनावरांच्या दुधापासून धोका नाही लम्पीग्रस्त जनावरांची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. पण अशा जनावरांचे दूध उकळून प्यायले तर अधिक चांगले, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त सहायक आयुक्त डाॅ. व्यंकटराव घोरपडे यांनी दिला आहे. दुधाला गरम करून सेवन केले गेले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात.  दूध जास्त उकळून घ्यावे. तसेच हळद टाकून पिल्यास अधिक उत्तम आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग