शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसंमेलनाचे कार्यक्रम अखेर जाहीर

By admin | Updated: February 11, 2016 01:45 IST

९६व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यास शिवसेना

ठाणे : ९६व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तर २१ फेब्रुवारी रोजी समारोप समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक खासदार राजन विचारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.तीन दिवसांच्या या संमेलनात संमेलनाध्यक्षांची मुलाखत, नाट्य परिषदेच्या विविध शाखांचे कार्यक्रम, मध्यवर्ती शाखेच्या विविध स्पर्धांतील विजेत्या एकांकिका, बालनाट्ये तसेच मध्यवर्ती शाखेची शिफारसपात्र नाटके, एकपात्री कार्यक्रम, खुले अधिवेशन, समारोप सोहळा आणि कलावंत रजनी हे पारंपरिक कार्यक्रम, तर संमेलनपूर्व कार्यक्रमांत एक संगीत नाटक, सात व्यावसायिक नाटके, दोन बालनाट्ये, दोन लोकनाट्ये, दोन संगीत रंगभूमीविषयी विशेष कार्यक्र म अशी भरगच्च मेजवानी नाट्यरसिकांकरिता असेल, असे विचारे यांनी सांगितले.19 फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. नाटककार श्याम फडके यांच्या निवासस्थानापासून नाट्यदिंडीस प्रारंभ होईल. दिंडी ब्राह्मण सोसायटी, विष्णूनगर, राममारुती रोडमार्गे दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे समाप्त होईल.संमेलनाच्या उद्घाटनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. गजानन कीर्तिकर, खा. अनिल देसाई, खा. विनायक राऊत अशा अनेकांसह महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी उपस्थित राहणार आहेत. समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री अनंत गीते, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता अशा राजकीय नेत्यांच्या गर्दीने मात्र संमेलन फुलणार आहे.दादोजी कोंडदेव स्टेडियम १८ फेब्रुवारीला सायं. ६.३० वा. नरेंद्र बेडेकर यांचा ‘ठाणे तिथे काही नाही उणे’, १९ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा. नंदेश उमप यांचे ‘शिवसोहळा’ महानाट्य, २० फेब्रुवारीला सकाळी ९.३० वा. ‘आमची बोली आमचा बाणा’, ११.३० वा. ‘नाट्यव्यवसायाची इंडस्ट्री कशी होणार’ परिसंवादात लता नार्वेकर, प्रसाद कांबळी, आनंद म्हसवेकर, डॉ. उदय निरगुडकर यांचा सहभाग असेल. दुपारी ३ वा. प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांचा ‘मराठी रंगभूमीचा पूर्वरंग’ कार्यक्रम होणार आहे. सायं. ५ वा. ‘नाटकाचे माध्यमांतर काय हरवतं? काय गवसतं?’ या परिसंवादात प्रशांत दामले, सुबोध भावे, गणेश मतकरी, वासंती वर्तक सहभागी होणार आहेत. सायं. ६.३० वा. उदय सबनीस यांचा ‘कलावंत रजनी’ आदी कार्यक्रम होणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. अभिनेते शरद पोंक्षे यांच्याशी मुक्तसंवाद साधला जाणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वा. ‘गेला तरुण प्रेक्षक कुणीकडे’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात जयंत पवार, राजन बने, अद्वैत दादरकर, संपदा कुलकर्णी, प्रेमानंद गज्वी, विजू माने सहभागी होणार आहेत. दुपारी ४ ते ६ या वेळेत खुले अधिवेशन समारोप व सायं. ७ वा. ‘नाट्य परिषद रजनी’ कार्यक्रम होतील, इतर कार्यक्रममो.ह. विद्यालयात १२ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा. ‘कट्यार काळजात घुसली’ व १३ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा. ‘स्वयंवर’ ही संगीत नाटके सादर होणार आहेत. युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे पूर्व येथे १७ फेब्रुवारी रोजी सायं. ६.३० वा. ‘बायांनो नवरे सांभाळा’ हे नाटक होणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे १५ ते १९ फेब्रुवारीला ४.३० वाजता विविध नाटके होणार आहेत. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. सर्वोत्तम एकांकिका महोत्सव होणार आहे. तसेच महिलांच्या नाटिका होतील. मिनी थिएटरमध्ये २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. नाट्य परिषद शाखांचे कार्यक्रम होणार असून, नाट्य परिषद स्पर्धेतील एकांकिका होतील, मासुंदा तलाव येथे १९ फेब्रुवारी रोजी राहुल देशपांडे व आनंद भाटे यांचे नाट्यसंगीत, २० फेब्रुवारी रोजी महेश काळे व सुबोध भावे यांचा ‘सूर निरागस हो’, २१ फेब्रुवारी रोजी शौनक अभिषेकी, मंजूषा पाटील यांचा ‘तीर्थ विठ्ठल’ हे कार्यक्रम सकाळी होतील, गडकरी रंगायतनमध्ये २० फेब्रुवारीला दुपारी ४ वा. संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची मुलाखत होईल. याशिवाय इतरही कार्यक्रम होतील.