डेंटल कॉलेजची फसवेगिरी

By Admin | Updated: November 18, 2014 02:50 IST2014-11-18T02:50:15+5:302014-11-18T02:50:15+5:30

जागेच्या कागदपत्रांची अफरातफर करून बांधकाम परवानगी मिळवून इमारत उभारणाऱ्या गार्डियन डेंटल कॉलेजची बांधकाम परवानगी पालिकेने रद्द केली आहे.

Draft College Draft | डेंटल कॉलेजची फसवेगिरी

डेंटल कॉलेजची फसवेगिरी

अंबरनाथ : जागेच्या कागदपत्रांची अफरातफर करून बांधकाम परवानगी मिळवून इमारत उभारणाऱ्या गार्डियन डेंटल कॉलेजची बांधकाम परवानगी पालिकेने रद्द केली आहे. त्यांनी चालू शैक्षणिक वर्षाकरिता ६७ विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने प्रवेश दिला आहे. हा प्रकार शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांनी उघड केला आहे. तसेच या प्रकरणी तक्रार करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचविण्याची मागणी केली आहे.
अंबरनाथ, जांभूळपाडा परिसरात एका शेतकऱ्याच्या जागेवर भले मोठे गार्डियन डेंटल कॉलेज उभारण्यात आले आहे. ज्या जागेवर हे महाविद्यालय उभारण्यात आले, त्या जागेचा मोबदला संबंधित शेतकऱ्याला अद्यापही दिलेला नाही. एवढेच नव्हेतर जागेचे खोटे दस्तऐवज तयार करून अंबरनाथ नगर परिषदेतून महाविद्यालय उभारण्यासाठी बांधकाम परवानगी मिळविण्यात आली. संबंधित शेतकऱ्याने यासंदर्भात दाद मागितल्यावर त्याच्या मागणीकडे गार्डियन डेंटल कॉलेजच्या संचालकांनी दुर्लक्ष केले. अखेर संबंधित शेतकऱ्याने शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांच्याकडे हे प्रकरण नेले. त्यांनी या प्रकरणी तक्रार केल्यावर या महाविद्यालयाची बांधकाम परवानगी अंबरनाथ नगर परिषदेने कायमस्वरूपी रद्द केली.
परवानगी रद्द झाल्याने अस्तित्वातील कॉलेजची इमारत अनधिकृत ठरली आहे. या अनधिकृत ठरलेल्या इमारतीतच कॉलेज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. एवढेच नव्हेतर विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करून संचालकांनी ६७ विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाकरिता प्रवेश दिला आहे. तसेच त्यांच्याकडून गडगंज शैक्षणिक फीदेखील आकारण्यात आली
आहे. मात्र, प्रत्यक्षात महाविद्यालयाला प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेण्याची कोणतीही मान्यता नसल्याची बाब वारिंगे यांनी उघडकीस आणली
आहे.
संचालकांच्या या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान रोखण्यासाठी त्यांनी या प्रकाराची थेट तक्रार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Draft College Draft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.