शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

डॉ. खोलेंची तक्रार घेणा-या पोलिसाला निलंबित करा; मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव : जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 08:54 IST

संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव आहे.आज स्वयंपाकबंदी केली, उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल. पाणी पिण्यास बंदी घातली जाईल

ठाणे, दि. 10 - पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला, म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करणा-या डॉ. मेधा खोले आणि त्यांचा गुन्हा दाखल करून घेणारा पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.अलीकडेच झालेल्या पावसात लोकांनी एकमेकांना हात देऊन जीव वाचवले. त्या वेळी कुणालाही कुठेच जात दिसली नव्हती. त्या वेळी फक्त ‘माणुसकी’ ही एकच जात दिसली होती. मात्र, खोले यांनी जातीपातीची मूळे किती खोलवर रुजलेली आहेत, हेच दाखवून दिले आहे. पाच वेळा या महिलेने केलेले जेवण आवडल्यानंतर यादव नावाच्या महिलेला नोकरीवर ठेवले होते. आता अचानक निर्मला हिची जात उघडकीस आल्याने खोले यांचा धर्म भ्रष्ट झाला, यावरून विशिष्ट लोकांच्या मनात जात किती घट्ट रुजलेली आहे, हेच दिसते. जे कालपर्यंत जात मानत नाही, असे बोलत होते, ते आता सोवळे सोडल्याचा कांगावा करून जर गुन्हा दाखल करत असतील, तर ते सहन केले जाणार नाही. तसेच ज्या मूर्ख पोलीस अधिका-याने हा गुन्हा दाखल केला, त्याची ओळख सबंध महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. म्हणून, त्याला आता तातडीने निलंबित करण्यात आले पाहिजे, असे आ. आव्हाड यांनी म्हटले आहे.आज स्वयंपाकबंदी केली, उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल. पाणी पिण्यास बंदी घातली जाईल, असे आव्हाड पुढे म्हणाले.‘...तर गंभीर परिणाम’संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव आहे. संविधानाला जर हात लावला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही आ. आव्हाड यांनी दिला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड