VIDEO- नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ.सुधीर तांबे विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:09 IST2017-02-07T00:09:57+5:302017-02-07T00:09:57+5:30
राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 5- विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे हे विजयी झाले. विभागीय आयुक्त ...

VIDEO- नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ.सुधीर तांबे विजयी
राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 5- विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे हे विजयी झाले. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले यांनी हा अधिकृत निकाल जाहीर केला. यावेळी निवडणूक निरीक्षक आर. जे. कुलकर्णी हे उपस्थित होते.
विजयी उमेदवार डॉ. तांबे यांनी पहिल्या पसंतीक्रमाची मते मिळावून त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत वसंतराव पाटील आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार प्रकाश देसले यांचा पराभव केला. अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे या निवडणुकीच्या मतमोजणीस सोमवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. प्रथम सर्व 401 मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे 50-50 चे गठ्ठे करण्यात आले.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या गठ्ठ्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर प्रत्येक टेबलवर एक हजार याप्रमाणे एकूण 30 टेबलवर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीस सुरूवात झाली. एकूण पाच फेऱ्यात ही मतमोजणी घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेनुसार पहिल्या पसंतीची आवश्यक मते डॉ. सुधीर तांबे यांना मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.