डॉ. श्रीपाल सबनीस यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
By Admin | Updated: November 6, 2015 16:03 IST2015-11-06T15:05:28+5:302015-11-06T16:03:27+5:30
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पार पडणा-या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे

डॉ. श्रीपाल सबनीस यांची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ६ - पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पार पडणा-या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी सबनीस यांच्यासह ज्येष्ठ कवी प्रा. विठ्ठल वाघ, लेखर शरणकुमार लिंबाळे, लेखक-प्रकाशक अरूण जाखडे, श्रीनिवास वारुंजीकर असे पाच उमेदवार होते. मतमोजणीत सबनीस यांना सर्वाधिक ४८५ मते पडल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी डॉ. सबनीस यांची संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. तर विठ्ठल वाघ यांना ३७३, अरूण जाखडे यांना २३०, शरणकुमार लिंबाळे यांना २५ तर श्रीनिवास वारुंजीकर यांना फक्त दोन मते पडली.
पुढील वर्षी जानेवारीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये हे संमेलन पार पडणार आहे.