शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मनमोहन सिंगांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवार यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 21:59 IST

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सामील होते.

नागपूर - यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सामील होते. मोदींनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पाकिस्तानच्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती. मोदींच्या या आरोपबाजीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार आज हल्लाबोल मोर्चात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतानाच मनमोहन सिंग यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खडेबोल सुनावले."मनमोहन सिंग यांच्यासारख्या प्रामाणिक आणि देशभक्त नेत्याचा पाकिस्तानशी संबंध जोडताना भाजपाला लाज वाटली पाहिजे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या मनात असले वाईट विचार कसे काय येऊ शकतात, असा सवाल शरद पवार यांनी केला. गुजरातमधील निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पाकिस्तानची मदत घेत आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सुद्धा उपस्थित होते, असा सनसनाटी आरोप मोदींनी केला. तब्बल 37 वर्षांनंतर शरद पवार आपल्या वाढदिवसा दिवशी एखाद्या मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या या हल्लाबोल मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसहभाग दिसून आला होता. या मोर्चानंतर आयोजित सभेसाठी गुलाम नबी आझाद, शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.   हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. झोपलेल्या सरकारला जागं करण्याठी आज हा हल्लाबोल मोर्चा काढावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिनकामाच्या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असहकार पुकारावा, वीज बिल, कर भरू नयेत असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017