डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू
By Admin | Updated: May 29, 2017 10:36 IST2017-05-29T09:57:53+5:302017-05-29T10:36:13+5:30
अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 29 - अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चारही नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
"एबीपी माझा"नं दिलेल्या वृत्तानुसार, एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला. शिवाय, डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. रविवारी (28 मे) ही घटना घडली आहे.
पंजाबराव देशमुख रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लोक उपचारासाठी येत असतात. या चारही बालकांच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे.
याप्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आणि रुग्णालयातील एक टीम या प्रकाराची चौकशी करणार आहे. त्यामुळे चौकशीनंतरच या बालकांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल.