डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण: CBI कडून दोन संशयितांची रेखाचित्रे जाहीर
By Admin | Updated: May 27, 2015 10:44 IST2015-05-27T10:16:02+5:302015-05-27T10:44:21+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सुरु असलेल्या सीबीआय तपासाला वेग आला असून सीबीआयने सहा प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने दाभोलकर यांच्यावर हल्ला करणा-या दोन मारेक-यांचे रेखाचित्र तयार केले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण: CBI कडून दोन संशयितांची रेखाचित्रे जाहीर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सुरु असलेल्या सीबीआय तपासाला वेग आला असून सीबीआयने सहा प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने दाभोलकर यांच्यावर हल्ला करणा-या दोन मारेक-यांचे रेखाचित्र तयार केले आहे. ही रेखाचित्र अगोदरच्या रेखाचित्रापेक्षा अधिक स्पष्ट असल्याचे सांगितले जाते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मारेक-यांना शोधण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. अखेर याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आता सीबीआयने या प्रकरणात दोन संशयितांची रेखाचित्र जाहीर केले आहेत.