शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : शरद कळसकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 19:59 IST

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकर यांची २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकर यांची २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआय कोठडीची मूदत संपत असल्याने कळसकर याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी दिले. 

   दुचाकीवरून आलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोलकरांची हत्या केली. त्यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी दोघेजण आधीच महर्षी शिंदे पुलावर येऊन थाबंले होते, असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी न्यायालयात केला होता. संबंधित दोघांचा सीबीआयने तपास सुरू केला असून त्याकरिता कळसकर यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शनिवारी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली केली होती. त्यानुसार कळसकर याच्या कोठडीत सोमवारपर्यंत ( १७ सप्टेंबर) वाढ करण्यात आली होती. दरम्यान कळसकर याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण घेत न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 

    दरम्यान, कळसकर आणि अंदुरे दुचाकीवरून पुलावर पोहचल्यानंतर त्यांनी पुलावर असलेल्या व्यक्तींपैकी डॉ. दाभोलकर कोण आहेत हे त्यांना सांगितले. दोघांकडून डॉ. दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर कळसकर आणि अंदुरे यांनी  गोळ्या झाडल्या आहेत. वैभव राऊत आणि कळसकर यांच्याकडे चार पिस्तूल होते. पिस्तुल तोडून त्यांचे तुकडे मुंबईतील एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात टाकून देत त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असे सीबीआयकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. कळसकर यांच्याकडे नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रांबाबत देखील चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला मुंबईतील कारागृहात ठेवण्यात येणार आहे, असे बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. धर्मराज चंडेल यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCourtन्यायालय