डॉ दिलीप म्हैसेकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

By Admin | Updated: February 7, 2016 15:48 IST2016-02-07T15:48:51+5:302016-02-07T15:48:51+5:30

डॉ दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आज नियुक्ती करण्यात आली.

Dr. Dilip Mhasekar's selection of the Vice Chancellor of Health Sciences University | डॉ दिलीप म्हैसेकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

डॉ दिलीप म्हैसेकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालचे प्रभारी अधिष्ठाता तसेच पल्मोनरी मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉ दिलीप गोविंदराव म्हैसेकर यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आज नियुक्ती करण्यात आली.
राज्यपाल तथा कुलपती चे विद्यासागर राव यांनी रविवारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर डॉ दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा केली. डॉ म्हैसेकर यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
डॉ अरुण जामकर यांचा कार्यकाळ 20 डिसेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. एकनाथ डवळे प्रभारी कुलगुरू म्हणून या पदाचा कार्यभार सांभाळीत होते.
डॉ दिलीप म्हैसेकर (जन्म १२ जुलै १९६० ) यांनी १९८४ साली औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी प्राप्त केली तर १९८९ साली मुंबईच्या जी एस वैद्यकीय महाविद्यालयातून (क्षयरोग व छातीचे विकार) या विषयात एमडी केले. डॉ म्हैसेकर यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव असून त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत.
राज्यपालांनी कुलगुरू निवडीसाठी दिल्लीच्या एम्स येथील प्रो डॉ निखिल टंडन यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिति गठित केली होती. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती आज राजभवन येथे झाल्या त्यानंतर डॉ दिलीप म्हैसेकर यांच्या नावाची घोषणा झाली. 
 

Web Title: Dr. Dilip Mhasekar's selection of the Vice Chancellor of Health Sciences University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.