डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी तावडेला न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: June 20, 2016 16:49 IST2016-06-20T16:33:16+5:302016-06-20T16:49:00+5:30
सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला आज शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण, आरोपी तावडेला न्यायालयीन कोठडी
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 20 - डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला आज शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआय कोठडीची मागणी कोर्टानं फेटाळून लावली आहे. कोल्हापूर प्रथम वर्ग न्यायालयाने तावडेला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच तावडे आणि पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड या दोघांनाही समोरासमोर बसवून चौकशी करण्याची मागणी सीबीआयनं केली असून, सीबीआय या दोघांच्या समोरासमोर चौकशीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लागल्यावरच पानसरे आणि कलबुर्गी हत्या प्रकरणातील धागेदोरे सापडण्याची शक्यता सीबीआयनं व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.