डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन ४ आॅक्टोबरला
By Admin | Updated: September 19, 2015 03:38 IST2015-09-19T03:38:38+5:302015-09-19T03:38:38+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ आॅक्टोबरला होणार आहे.

डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन ४ आॅक्टोबरला
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ आॅक्टोबरला होणार आहे.
रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. इंदू मिलच्या साडेबारा एकर जागेवर हे स्मारक उभारले जाणार आहे.
या स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम एका फ्रेंच कंपनीला आणि मुंबईतील प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांना देण्यात आले होते. दोघांनीही आपले आराखडे सादर केले आहेत. प्रभू यांनी स्मारकाच्या कामासाठी ४२५ कोटी रुपये खर्च येईल, असे नमूद केले होते. फ्रेंच कंपनीने खर्चाची रक्कम नमूद केली नव्हती.
स्मारकामध्ये भव्य सभागृह, डॉ. बाबासाहेबांचा भव्य पुतळा, समृद्ध ग्रंथालय, बौद्ध स्तूप आदींचा समावेश असेल. इंदू मिलच्या जागेचा ताबा राज्य शासनाला या आधीच मिळाला आहे. (विशेष प्रतिनिधी)
लंडनच्या घराचे पैसे सोमवारी भरणार
लंडनमध्ये डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य होते ती वास्तू खरेदी करण्यासाठीची रक्कम घरमालकाला राज्य शासनाकडून सोमवारी अदा करण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की वित्त विभाग आणि सामाजिक न्याय विभागाने याबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. रिझर्व्ह बँकेत ही रक्कम जमा केली जाईल.