शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल- अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 17:11 IST

राजमाता जिजाऊ यांच्या 421व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजामध्ये सोहळा

सिंदखेडराजा: आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करा. प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या, तर शिवबा जन्माला येईल, असं अभिनेते आणि शिवसेनेचे नेते डॉ. अमोल कोल्हेंनी म्हटलं. राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजामाता यांच्यावर भाष्य केलं. जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यामुळे प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला यायला हव्यात. कारण प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या तर शिवबा जन्माला येईल, असं कोल्हे म्हणाले. प्रत्येकानं आपल्या मनातला शिवविचार जागा ठेवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. याशिवाय आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याचाही सल्ला दिला. जिजाऊंच्या जन्मोत्सव कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हेंनी 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल उपस्थितांचे आभार मानले. 'या मालिकेत लवकरच संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवला जाणार आहे. हा सोहळा रायगडावर चित्रित केला जावा, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी खासदार संभाजी राजे यांच्याशी संवाद साधला आहे. आता महाराजांची इच्छा असेल, तर राज्याभिषेकाचा सोहळा नक्कीच रायगडावर चित्रित होईल,' असंदेखील कोल्हे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSwarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीRaigadरायगड