डॉ. आंबेडकर यांच्या घराचे इरादापत्र
By Admin | Updated: January 29, 2015 05:49 IST2015-01-29T05:49:44+5:302015-01-29T05:49:44+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमध्ये वास्तव्य असलेले घर खरेदी करण्याकरिता तेथील भारताच्या उच्चायुक्तांना

डॉ. आंबेडकर यांच्या घराचे इरादापत्र
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमध्ये वास्तव्य असलेले घर खरेदी करण्याकरिता तेथील भारताच्या उच्चायुक्तांना ‘लेटर आॅफ इंटेन्ट’ अर्थात इरादापत्र पाठवण्यात आले असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. तावडे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेले लंडन येथील घर हे सांस्कृतिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली ही वास्तू खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. योग्य किमतीत हे घर खरेदी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. (विशेष प्रतिनिधी)