शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
4
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
7
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

एक डझन ट्रॅप कॅमेरे, 'ड्रोन'द्वारे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्या 'नजरकैद' : २२ पिंजरे तैनात

By azhar.sheikh | Published: October 03, 2017 4:48 PM

पंधरवड्यापूर्वी लखमापूर पंचक्रोशीमधील म्हेळुस्के व हनुमानवाडी या वस्तींवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. येथील वरखेडा, अवनखेड, परमोडी, जोपूळ, चिंचरवेड, ओझरखेड हा संपूर्ण बागायती परिसर आहे.

ठळक मुद्दे बिबट्याचा माग दररोज काढला जात असून, त्याच्या पाऊलखुणांवरून अंदाज घेत परिसरात पिंजºयांचे स्थलांतर केले जात आहे. २२ पिंजरे या पंचक्रोशीत तैनात संध्याकाळनंतर बाहेर पडताना दक्षता घ्यावी, वन कर्मचाºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनया भागात मोठ्या प्रमाणात ऊसशेती असल्याने बिबट्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे

नाशिक : पंधरवड्यात दिंडोरी तालुक्यातील लखमापूर पंचक्रोशीत दोन बालके बिबट्यांच्या हल्ल्यात दगावल्याने नागरिकांमध्ये भीती अन् संताप व्यक्त होत आहे. या घटनांनी वनविभागाचीही झोप उडाली असून, २२ पिंजरे संपूर्ण पंचक्रोशीत तैनात करण्यात आले आहे. ३५ ते ४० कर्मचारी सातत्याने उसाचे ‘जंगल’ पिंजून काढत आहे. याबरोबरच एक डझन ट्रॅप कॅ मेरे परिसरात बिबट्यांच्या पाऊलखुणा बघून सज्ज ठेवून ड्रोनद्वारेही रात्री बिबट्याचा माग काढत एकप्रकारे वनविभागाने जणू या भागात धुमाकूळ घालणाºया बिबट्यांना कैद करण्यासाठी ‘नजरकैद’ केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पंधरवड्यापूर्वी लखमापूर पंचक्रोशीमधील म्हेळुस्के व हनुमानवाडी या वस्तींवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. येथील वरखेडा, अवनखेड, परमोडी, जोपूळ, चिंचरवेड, ओझरखेड हा संपूर्ण बागायती परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात ऊसशेती असल्याने बिबट्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.

गावकºयांनी अद्यापपर्यंत वनविभागाला केलेले सहकार्य उत्तमप्रकारचे असून, गावकºयांच्या सहकार्याशिवाय वनविभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांना या भागात बिबट्याला जेरबंद करण्यात यश येणार नाही, असे उपवनसंरक्षक माणिकनंदा रामानुजम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बिबट्याला पकडण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न वनविभागाकडून केले जात आहे. लवकरच या प्रयत्नांना यश येईल. नागरिकांनी संयम व सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा तसेच संध्याकाळनंतर बाहेर पडताना दक्षता घ्यावी, वन कर्मचाºयांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन रामानुजम यांनी केले आहे.

म्हेळुस्के येथे पंधरा दिवसांपूर्वी तीन वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला तर हनुमानवाडी येथे या घटनेच्या आठवडाभरानंतर बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना दुर्दैवी आहेत. मुलांच्या पालकांना वनविभागाकडून आर्थिक मदत मिळवून दिली जाणार असल्याचे रामानुजम म्हणाले.ऊसशेतीमुळे बिबट्याला ट्रॅप करून जेरबंद करण्यात अपयश येत आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक, वनपाल, वनमजूर गटातील एकूण ४० कर्मचारी या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बिबट्याचा माग दररोज काढला जात असून, त्याच्या पाऊलखुणांवरून अंदाज घेत परिसरात पिंजºयांचे स्थलांतर केले जात आहे. २२ पिंजरे या पंचक्रोशीत तैनात असून, सहा पिंजरे खास नगर वनवृत्त हद्दीतून मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.