हुंडाबळी खटल्यात कामगार निदरेष
By Admin | Updated: July 10, 2014 01:26 IST2014-07-10T01:26:50+5:302014-07-10T01:26:50+5:30
सूर्यकांत दादासाहेब बिताळे या मुंबईतील माथाडी कामगाराची सर्वोच्च न्यायालयाने हुंडाबळीच्या खटल्यातून सुमारे 1क् वर्षानी निदरेष मुक्तता केली आहे.

हुंडाबळी खटल्यात कामगार निदरेष
मुंबई : मुळचा सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील असलेल्या सूर्यकांत दादासाहेब बिताळे या मुंबईतील माथाडी कामगाराची सर्वोच्च न्यायालयाने हुंडाबळीच्या खटल्यातून सुमारे 1क् वर्षानी निदरेष मुक्तता केली आहे.
पत्नी अर्चना हिता लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यांत अंगावर रॉकेल ोतून व जाळून हुंडय़ासाठी खून केल्याच्या आरोपावरून सूर्यकांतवर खटला चालला होता. त्यात सत्र न्यायालयाने त्याला निदोष ठरविले होते. परंतु त्याविरुद्ध अर्चनाचे वडील दिलीप बजरंग काळे यांनी केलेला पुनरिक्षण अर्ज मंजूर करून उच्च न्यायालयाने मे 2क्क्4 मध्ये खटल्याची नव्याने सुनावणी करण्यासाठी खटला सत्र न्यायालयाकडे परत पाठविला होता. याविरुद्ध सूर्यकांतने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात न्या. सुधांशु ज्योती मुखोपाध्याय व न्या. आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने मंजूर केले व सूर्यकांतला निदरेष मुक्त करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायम केला.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, उच्च न्यायालयात आलेले प्रकरण हे गुणवत्तेवर केलेले अपील नव्हते तर पुनरिक्षण अर्ज होता. त्यामुळे खालच्या न्यायालयात झालेल्या साक्षी-पुराव्यांचे नव्याने मूल्यमापन करणो अपेक्षित नव्हते. तरीही उच्च न्यायालयाने तसे केले. खरे तर सत्र न्यायालयाने काढलेला निष्कर्ष उपलब्ध साक्षीपुराव्यांचा समग्रतेने विचार करून काढलेला समग्र निष्कर्ष होता. त्यामुळे केवळ दुसरा निष्कर्ष काढणो शक्य आहे म्हणून त्यात उच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करणो गैर आहे.
खटाव तालुक्यातील काळेवाडी येथे राहणा:या सूर्यकांतचे त्याच तालुक्यातील गारवाडी येथील अर्चनाशी 6 जून 2क्क्3 रोजी लग्न झाले.
8 जून रोजी सत्यनारायणाची पूजा झाल्यावर प्रथेप्रमाणो 9 जूनला ती माहेरी गेली व 11 जूनला पुना सासरी आली. त्यानंतर थोडय़ाच दिवसात ती घरात 95 टक्के भाजली व इसिपतळात मरण पावली होती. (विशेष प्रतिनिधी)
च्इस्पितळात नोंदविलेल्या पहिल्या मृत्यूपूर्व जबानीत अर्चनाने, स्वयंपाक करत असताना स्टोव्हवर साडीच्या पदराने पेट घेतल्याने आपण भाजलो. त्याचा नव:याशी काही संबंध नाही, उलट त्याने चादर टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला व त्यात तोही थोडा भाजला, असे सांगितले होते.
च्मात्र इस्पितळात वडील भेटून गेल्यावर तिने दुसरी मृत्यूपूर्व जबानी दिली व त्यात तिने लागोपाठ दुस:यांदा शरीरसंबंध करण्यास नकार दिल्याच्या रागात पतीने आपल्याला जाळले, असे सांगितले. दरम्यान, अर्चनाच्या वडिलांनी फग्युसन पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत हुंडय़ासाठी तिला जाळल्याची आरोप केला गेला होता.