धोटे यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली!

By Admin | Updated: March 7, 2017 04:50 IST2017-03-07T04:50:10+5:302017-03-07T04:50:10+5:30

‘विदर्भवीर’ जांबुवंतराव धोटे यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांना सोमवारी सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Dowry and tribute to departed members! | धोटे यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली!

धोटे यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली!


मुंबई : ‘विदर्भवीर’ जांबुवंतराव धोटे यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांना सोमवारी सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. धोटे यांच्या निधनाने विदर्भाच्या विकासाची तळमळ असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला असून एका पर्वाची अखेर झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. धोटे यांचे जीवन वादळी होते आणि आपल्या जीवननिष्ठा जपताना त्यांनी मूल्यांशी तडजोड केली नाही. ते विदर्भवादी होते पण त्यांची राष्ट्रीय विचारांची मांडही तेवढीच पक्की होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच काँग्रेसचा निष्ठावान नेता हरपल्याची संवेदना व्यक्त केली. त्यांच्या निधनाने पक्षनिष्ठेचे एक उदाहरण काळाच्या पडद्याआड गेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. माजी सदस्य आनंदराव कोंडिबा देसाई, पुंजाजी बापुजी कडू- पाटील, माणिकराव उर्फ रावसाहेब रामचंद्र आपोतीकर, वामनराव उर्फ बाबासाहेब बाजीराव भोकरे, बाबुसिंग दगडूसिंग राठोड, चंद्रशेखर धोंडिबा भोसले यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. हरिभाऊ बागडेंसह अनेक सदस्यांनी भावना व्यक्त केल्या.

Web Title: Dowry and tribute to departed members!