दशक्रियेसाठी नैवेद्य घेऊन जाताना दाम्पत्य ठार

By Admin | Updated: May 29, 2017 20:17 IST2017-05-29T20:17:55+5:302017-05-29T20:17:55+5:30

आष्टा-सांगली रस्त्यावर मिरजवाडीनजीक सनी पेट्रोलपंपासमोर सोमवारी सकाळी साडेनऊ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार झाले.

Doubtlessly killed for taking action for a day | दशक्रियेसाठी नैवेद्य घेऊन जाताना दाम्पत्य ठार

दशक्रियेसाठी नैवेद्य घेऊन जाताना दाम्पत्य ठार

>ऑनलाइन लोकमत
आष्टा (सांगली), दि.29 - आष्टा-सांगली रस्त्यावर मिरजवाडीनजीक सनी पेट्रोलपंपासमोर सोमवारी सकाळी साडेनऊ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नी ठार झाले. जोसेफ विष्णू आवळे (वय ४६, रा. बुधगाव, ता. मिरज) व कविता जोसेफ आवळे ४०) अशी त्यांची नावे आहेत. कविता यांच्या वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी ते नैवेद्य घेऊन जात असताना हा अपघात झाला. या त्यांचा मुलगा सार्थक (१०) गंभीर जखमी झाला आहे.
बुधगाव येथील जोसेफ व कविता आवळे दाम्पत्यापैकी कविता यांचे माहेर आष्टा आहे. त्यांचे वडील नागनाथ पांडुरंग अवघडे (रा. अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाजवळ, जयंत बेघर वसाहत) यांचे नुकतेच निधन झाले. सोमवारी त्यांचा दहाव्याचा विधी होता. त्यासाठी सकाळी  नैवेद्य घेऊन जोसेफ, कविता व त्यांचा मुलगा सार्थक दुचाकीवरून (क्र. एमएच १० एयू २०२६) आष्ट्यास येत होते. मिरजवाडीनजीक सनी पेट्रोलपंपासमोर समोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. तिघेही दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. जोसेफ व कविता यांच्या डोक्यास गंभीर मार लागला, तर सार्थक यास हातास दुखापत झाली. अपघातानंतर तातडीने जोसेफ यांना मिरज शासकीय रुग्णालयात, तर कविता यांना आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. सार्थकवर आष्टा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जोसेफ यांच्या मृतदेहाचे विच्छेदन मिरजेत, तर कविता यांच्या मृतदेहाचे विच्छेदन आष्टा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. आष्टा पोलिसात अपघाताची नोंद झाली असून, पोलिस उपपनिरीक्षक जहॉँगीर शेख अधिक तपास करीत आहेत.
 
नातेवाईकांचा आक्रोश..
कविता व जोसेफ आवळे यांना सार्थक व सहारा (८) अशी दोन अपत्ये आहेत. वडिलांच्या कार्यविधीसाठी नैवेद्य घेऊन येत असताना कविता यांचा पती जोसेफसह मृत्यू झाल्याची बातमी आष्टा परिसरात समजताच परिसर शोकमग्न झाला. दुपारी चार वाजता कविता यांचा मृतदेह माहेरी आणल्यानंतर आई, भाऊ, बहिणी व नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता.

Web Title: Doubtlessly killed for taking action for a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.