‘अवकाळी’मुळे तारांबळ

By Admin | Updated: November 16, 2014 00:51 IST2014-11-16T00:51:36+5:302014-11-16T00:51:36+5:30

अवकाळी पावसाने पिंपरी चिंचवड शहर व मावळ परिसराला शुक्रवारी रात्रभर व शनिवारी सकाळी झोडपून काढले.

Doubtful to 'dawn' | ‘अवकाळी’मुळे तारांबळ

‘अवकाळी’मुळे तारांबळ

पिंपरी : अवकाळी पावसाने पिंपरी चिंचवड शहर व मावळ परिसराला शुक्रवारी रात्रभर व शनिवारी सकाळी झोडपून काढले. रात्री घराकडे परतणा:या व शनिवारी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची, विद्याथ्र्याची चांगलीच धांदल उडाली. बहुतेक भागात संततधार पाऊस झाला. शहरांत दमट, कोंदट वातावरण व गावांकडे भातपिकाचे नुकसान झाले. तर ज्वारी आणि इतर पिकांना पावसाचा फायदा झाला.
मुन्नारचे आखात, दक्षिण तमिळनाडू भागावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सध्या सर्वत्र ढग दाटून आले आहेत. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. मावळ तालुक्यात काही गावांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहरातही हलका शिडकावा झाला. सायंकाळी पाऊस बरसण्याची स्थिती निर्माण झाली होती. रात्री 11 च्या सुमारास शहरात सर्वच भागात रिमझीम पावसाला सुरूवात झाली. यानंतर पावसाचा जोर वाढतच राहिला. त्यामुळे पावसापासून बचावासाठी सोबत कोणतीच साधने नसणा:या व रात्री उशीरा घरी परतणा:या दुचाकीस्वार कामगारांना भिजतच घर गाठावे लागले.  विकएण्डला बाहेर फिरण्यास जाण्याचे नियोजन म्हणून शुक्रवारी कामावरून परतल्यावर अनेकजण खरेदीसाठी, तसेच विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्यास घराबाहेर पडले. मात्र त्यांचीही एकच तारांबळ उडाली. 
भाताची काढणी सुरू असणा:या शेतक:यांची या पावसाने चांगलीच धांदल उडविली. कापणी करून सुकण्यास ठेवलेल्या भात पीकाच्या आळाशांवर पाणी पडून थोडय़ा प्रमाणात नुकसान झाले. उभ्या भातपिकाला यामुळे फारसे नुकसान सोसावे लागले नाही. ठरावीक शेतक:यांच्या काढणीस उशीर 
झालेले भातपिक आडवे होऊन नुकसान झाले. मात्र खरीप हंगामातील इतर बहुतेक पिकांची काढणी 
पूर्ण झाल्याने नुकसानीची वेळ 
आली नाही. (प्रतिनिधी)
 
लोणावळ्यात  
पहाटेपासून
रिपरिप
4लोणावळा : पावसाळा संपून हिवाळा सुरु झालेला असताना मागील दोन ते तीन दिवसांपासून परिसरात सुटलेली हवा व ढगाळ वातावरणानंतर आज पहाटेपासून शहर व ग्रामीण भागात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने नागरिकांचे तसेच शेतक:यांचे हाल झाल़े 
4हलक्या सरींनंतर निरभ्र झालेल्या आकाशात रात्री ढग दाटून आले. शनिवारी पहाटे 4 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली़ ही रिपरिप व संततधार सुरुच राहिल्याने नागरिकांना तसेच पायी वारी करणा:या वारक:यांना त्रस सहन करावा लागला़ तसेच सुटीनिमित्त आलेल्या पर्यटकांनाही त्रस सहन करावा लागला. महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे चालकांचे हाल झाले. प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास उशिर झाला.
 

 

Web Title: Doubtful to 'dawn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.