म्हारळमध्ये दुहेरी हत्याकांड ; ५ अटकेत
By Admin | Updated: June 3, 2016 03:22 IST2016-06-03T03:22:19+5:302016-06-03T03:22:19+5:30
कल्याणनजीकच्या म्हारळ गावातील राधाकृष्णनगरी येथील जनाई विद्यालयासमोर बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

म्हारळमध्ये दुहेरी हत्याकांड ; ५ अटकेत
म्हारळ : कल्याणनजीकच्या म्हारळ गावातील राधाकृष्णनगरी येथील जनाई विद्यालयासमोर बुधवारी रात्री दीडच्या सुमारास दोन सुरक्षारक्षकांची हत्या झाली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
राजू सुनार (२८) आणि मदन सुनार (३०) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. राजू आणि मदन ड्युटी संपल्यावर जेवायला घरी आले होते. जेवण झाल्यावर मदन घरी जाण्यासाठी निघाला असता राजू त्याला सोडण्यासाठी जवळच्या बालाजी इमारतीपर्यंत गेला होता. त्या वेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला.
या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अनिल पटेनिया (१९), हरदीप सिंग गिल (१८), रामअनिल देमानी, राज शिरवानी (१८) आणि अन्य एकाचा समावेश आहे. अनिलने राजू आणि मदन यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले होते. परंतु, त्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली. (प्रतिनिधी)