आषाढ सुरु झाला म्हणून गाव दरवाजाचा मार्ग वाहनांसाठी बंद...

By Admin | Updated: July 7, 2016 17:48 IST2016-07-07T17:48:17+5:302016-07-07T17:48:17+5:30

आषाढ महिन्याच्या प्रारंभी येथे परंपरेनुसार वेशीच्या द्वारात ओंडके आडवे टाकून वाहनांना हा मार्ग बंद केला आहे. पहिल्या मंगळवारी मरिआईचा भंडाराही उत्साहात पार पडला

The door of the village door is closed for vehicular traffic because of the horror ... | आषाढ सुरु झाला म्हणून गाव दरवाजाचा मार्ग वाहनांसाठी बंद...

आषाढ सुरु झाला म्हणून गाव दरवाजाचा मार्ग वाहनांसाठी बंद...

ऑनलाइन लोकमत
भडगाव : आषाढ महिन्याच्या प्रारंभी येथे परंपरेनुसार वेशीच्या द्वारात ओंडके आडवे टाकून वाहनांना हा मार्ग बंद केला आहे. पहिल्या मंगळवारी मरिआईचा भंडाराही उत्साहात पार पडला.
आषाढ महिन्यात गावाच्या वेशीवर ओडके आडवे पाडून महिनाभर बैलगाड्या, वाहनांना दरवाजातून प्रवेशाला बंदी असते. यामागे पावसाळ्यात विविध रोग बैलगाड्या अथवा वाहनांसोबत गावात येवू नये म्हणून महिनाभर गाव दरवाजात लाकूड टाकण्याची परंपरा असल्याचे वयोवृध्द सागतात. भंडाऱ्याच्या दिवशी गावातील बहुतेक घरात मटणाचा बेत असतो.

भंडाऱ्याला मोठ्या प्रमाणावर पाहुण्यांची गर्दी गावात होते. भंडाऱ्याची सांगता श्रावणातील पहिल्या शुक्रवारी लोकनाट्याचा कार्यक्रमाने केली जाते. तगतराव मिरवणुकीचे बैलगाडे टाकून दरवाजाचे लाकूड बाजूला करुन रहदारीस वापर दिला जातो. दरम्यान महिनाभर बैलगाडी व इतर मोठी वाहने गावाबाहेरील दुसऱ्या मार्गाने गावात येतात. पूर्वी बैलगाड्या गावाबाहेरच उभ्या केल्या जायच्या. मोटरसायकलल मात्र येथून प्रवेश करता येतो.

Web Title: The door of the village door is closed for vehicular traffic because of the horror ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.