शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

'चिंता करू नका, नितेश राणेंनाही असंच जेलमध्ये जावं लागणार'; अंबादास दानवेंचं विधान, राणेंनीही केला पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:49 IST

Nitesh Rane Ambadas Danve: नारायण राणे यांच्या अटकेची परतफेड करणार, असे नितेश राणे म्हणाले होते. त्यावर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक विधान केलं आहे.

Maharashtra Latest News: 'नितेश राणेंनाही जेलमध्ये जावं लागणार. नारायण राणे हे एक दिवसच जेलमध्ये राहिले होते. पण नितेश राणेंना लांबचा मुक्काम होऊ शकतो', असे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. दानवेंच्या विधानाला राणेंनीही उत्तर दिले. 'बघू, ते जातात की मी जातो', असे राणे म्हणाले.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री नितेश राणे नारायण राणे यांना अटक झालेल्या व्हिडीओबद्दल बोलले होते. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्या दिवशी तो व्हिडीओ डिलीट करेन, असे विधान राणेंनी केले होते. 

नितेश राणेंच्या या विधानाबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, "नितेश राणेंनाही एक दिवस असंच जावं लागणार आहे. त्याची चिंता करू नका. ज्या पद्धतीने वक्तव्य नितेश राणेंकडून महाराष्ट्रात होत आहे. त्यांना (नारायण राणे) तरी एक दिवस झालं. मला वाटतं लांबचा मुक्काम तुमचा होऊ शकतो."

राणे म्हणाले, मी डब्बा पाठवण्याची व्यवस्था करतो

दानवे यांच्या विधानाबद्दल नितेश राणेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "हो ना. बघू, ते जातात की मी जातो. माझे जेलमध्ये जाण्याचे दिवस आता काही येत नाही. पण, कदाचित त्यांचे दिवस जवळ आले असतील. त्यांचे किंवा त्यांच्या मालकाचे. तेव्हा बघू. तेव्हा जेवणाचा डब्बा मीच पाठवतो, पाहिजे तर...", असे उत्तर राणेंनी दानवेंना दिलं.  नितेश राणेंनी परतफेड करण्याबद्दल काय म्हटलं होतं? 

"साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा जो क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्या दिवशी डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब होणार. कारण राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटत नाहीत. एवढं विश्वासाने मी आपल्याला सांगतो", असे राणे म्हणाले होते. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Ambadas Danweyअंबादास दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण