शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 08:21 IST

पुण्यात राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या कारवर काही अज्ञातांनी मंगळवारी हल्ला केला.

पुण्यात राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या कारवर काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. वेळीच सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र पोलिसांनी हल्लेखोरांना कारपासून दूर केल्याने आणि काहींना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पुण्यातील कात्रज येथे सिग्नलवर सामंत यांची कार थांबली असताना रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, या घटनेवर शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटलं आहे.

“पुण्यात शिवसेनेची कात्रज याठिकाणी सभा झाली. त्या सभेच्या नंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दिसून येत आहे. बऱ्याच वाहिन्यावर चित्रीकरण गेलेला आहे. या सगळ्या घटनेच्या मध्ये पूर्णपणे मी स्पष्ट करू इच्छिते की, हे जे लोक आहेत ते कोण आहेत नक्की ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गृहीत धरणे की हे शिवसैनिकच आहेत किंवा कसं आणि तो हल्ला काही पूर्वनियोजित आहे की काय वगैरे अशा पद्धतीचे आरोप केले जातात ते योग्य नाही,” असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

“आमच्या सभेत आदित्य ठाकरेंनी विचार मांडलेले होते. उलट ज्यांना शिवसेनेची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होते. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गाडी फोडण्याच्या घटनेशी या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले उदय सामंत?"झालेला प्रकार निंदनीय आहे. अशाप्रकारे हल्ले झाल्याने उदय सामंत थांबणार नाही. नाना भानगिरे यांच्याकडचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तानाजी सावंत यांच्या घरी जात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा निघून गेला आणि माझी कार सिग्नलवर थांबली. त्यावेळी माझ्या कारच्या बाजूला अचानक दोन गाड्या आल्या आणि त्यातून १२-१५ लोकं उतरली आणि त्यांनी माझ्या कार वर हल्ला केला. ते लोक शिवसैनिक नव्हते असं उत्तर शिवसेनेच्या विनायक राऊतांनी सांगितले. पण मी सांगतो की अशा हल्ल्यांनी उदय सामंत थांबणार नाही", असं उदय सामंत म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाNeelam gorheनीलम गो-हे