शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

विजय आपलाच होईल असं समजू नका...; देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 10:05 IST

भाजपाच्या या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी सहभाग घेतला होता. 

मुंबई - Devendra Fadnavis on Election ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या विजयाबद्दल आत्मसंतुष्ट न होण्याचा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घेण्याचा सल्ला फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपाचा विजय होणारच आहे हे समजून प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलवर काम करणं थांबवू नका असा सूचक इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, सर्वसामान्य आणि गरिबांशी संवाद साधा जे भाजपाचे मतदार आहेत. आपला विजय निश्चित आहे असा समज करून प्रयत्न करणे सोडू नका. तिकीट कुणाला मिळेल याची चिंता करू नका. भाजपा कार्यकर्त्यांनी गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांवर लक्ष केंद्रीत करा. समाजातील या चार घटकांना नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ झाला आहे. जातीबाबतचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी जातीचा विचार करू नका असं त्यांनी सांगितले. भाजपाच्या या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी सहभाग घेतला होता. 

देवेंद्र फडणवीस असतील स्टार प्रचारकभाजपाने निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीसांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीसांची भाषण शैली, राजकीय कौशल्य यामुळे २०२४ च्या निवडणुकीत मतदारांना आकर्षिक करण्यात यश येईल. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कामांबाबत जनतेसमोर फोकस केले जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यात फडणवीसांची रॅली होईल. येत्या फेब्रुवारीपासून मिशन महाराष्ट्र ४५ प्लस या अभियानासाठी ते राज्यभरात दौरा करतील आणि दिवसाला ३ सभा घेत लोकांना संबोधित करतील. 

जागावाटप अंतिम टप्प्यातराज्यात भाजपा-शिंदे गट-अजित पवार गट यांच्यातील जागावाटप फॉर्म्युला जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रात भाजपा २६ जागांवर निवडणूक लढेल तर शिवसेना शिंदे गट-अजित पवार गट मिळून २२ जागांवर निवडणूक लढेल. राज्यात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. 

महाविकास आघाडीतही जागावाटपावरून रस्सीखेचराज्यात काँगेस-उद्धव ठाकरे गट- शरद पवार गट यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाने २३ जागा मागितल्या असून शरद पवार गटही १०-११ जागा लढण्यासाठी आग्रही आहे. त्यात काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वासोबतच आम्ही चर्चा करू असं ठाकरे गट सातत्याने सांगत आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेते काहीसे नाराज झाले आहेत. ठाकरे गट २३ जागा लढवणार तर आम्ही काय करायचे असा थेट सवाल काँग्रेस नेते विचारत आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाElectionनिवडणूक