शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: लाखो भाडेकरुंना मिळणार दिलासा; ठाकरे सरकारची घरमालकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 18:03 IST

coronavirus गृहनिर्माण विभागाची घरमालकांना सूचना; बिकट परिस्थिती लाखो कुटुंबांना दिलासा

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्रातल्या व्यक्तींना आणि हातावर पोट असलेल्या कामगारांना बसला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण विभागानं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. घरभाडं वसुली तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी सूचना विभागानं राज्यातल्या घरमालकांना केली आहे.लॉकडाऊनमुळे अनेकांसमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वत:चं घर नसलेल्या कुटुंबांसमोर तर दुहेरी संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे भाडेकरूंना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण विभाग पुढे सरसावला आहे. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत घर भाडं वसुली पुढील तीन महिने पुढे ढकलावी. भाडं थकल्यानं कोणत्याही भाडेकरूंना घरांमधून बाहेर काढलं जाऊ नये, अशा सूचना राज्यातल्या सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत.पुढचा काळ अतिशय कठीण आहे. त्यामुळे या परिस्थितीत गरिबांच्या मागे उभं राहायला हवं, अशी भूमिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबांसमोरील संकट तर अतिशय मोठं आहे. त्यामुळेच पुढील तीन महिने भाडेवसुली केली जाऊ नये, अशा सूचना सर्व घरमालकांना देण्यात आल्या आहेत. याचा अर्थ भाडं द्यायचंच नाही असा होत नाही. हातावर पोट असणाऱ्यांसमोर सध्या खायचं काय, भाडं द्यायचं कुठून असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यातला घरभाड्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न गृहनिर्माण विभाग करत असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्र मोठ्या मनाचा आहे. त्यामुळे या परिस्थितीत घरमालक भाडेकरुंच्या पाठिशी उभी राहतील आणि भाड्यासाठी तगादा लावणार नाहीत, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. काही घरमालकांचं कुटुंब घर भाड्यातून येणाऱ्या पैशांवर चालतं, याची कल्पना आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण आपलं योगदान देत आहे. त्याप्रमाणे समाज व्यवस्था सांभाळण्यासाठी घरमालक योगदान देतील, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. 

CoronaVirus नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड