शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Sambhaji Raje : "उगाच समाजाची दिशाभूल करू नका", स्वतंत्र मागासवर्ग आयोगावरून संभाजीराजेंनी राज्य सरकारला ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 15:08 IST

Sambhaji Raje Chhatrapati : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारच्या या नवीन मागासवर्ग आयोगाला विरोध केला आहे.

मुंबई :  मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्य सरकारच्या या नवीन मागासवर्ग आयोगाला विरोध केला आहे. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात, घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ठणकावले आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी समाजाला वेठीस धरू नये म्हणून मी एकट्याने आंदोलन करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 10 दिवसात महाराष्ट्रातील वातावरण बदलले. मला पाठिंबा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना पाठिंबा आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. मी अठरा पगड जात,12 बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब मराठ्यांसाठी माझा लढा आहे. 2007 पासून महाराष्ट्रात फिरतोय, प्रत्येक दौऱ्यात आरक्षण का हवे याबाबत जनजागृती केली. समाजासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभे राहिले, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

याचबरोबर, मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मागासवर्ग आयोगबाबत विचारणा केली असता संभाजीराजे छत्रपती यांनी याला विरोध दर्शविला. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये, अशा शब्दांत ठणकावत संभाजीराजे छत्रपती यांनी मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोन आले होते. मी प्रवासात होतो, बोलणे मात्र झाले नाही, असे सांगितले. 

'मी महाराजांचा वंशज, हा लढा मी लढायलाच हवा'मी महाराजांचा वंशज आहे. हा लढा मी लढायलाच हवा. हा माझा निर्णय आहे. अनेक आंदोलने केली. सरकारकडे मागण्या दिल्या. पण सरकारने शब्द पाळला नाही. शब्द न पाळल्याने मला दुसरा पर्याय राहिला नाही. मी जी चळवळ सुरू केली. त्यात समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी आमरण उपोषण सुरू केले आहे. 17 जूनला ज्या मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या आहेत. त्यात तसूभरही बदल केला नाही. पण सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

'कुंभकोणी काही भलतंच सांगतात'मागण्या फार छोट्या आहेत. आर्थिक महामंडळ मदत वाढवा, आर्थिक तरतूद करा. सारथी संस्था सबलीकरण,सक्षमीकरण करा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह मागणी केली होती. फक्त ठाण्यात सुरू झाले. मराठा आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. पण अजून गुन्हे मागे घेतले नाही. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांचा विषय होता. त्यांचे सिलेक्शन झाले त्यांना अजून नियुक्त्या नाही. कोव्हिड कारण सांगून नियुक्ती देत नाहीत. सुपर न्यूमरी पद्धतीने मार्ग काढा. कोर्टाचा संबंध नाही. ते म्हणतात कोर्टाच्या निर्णयाचा भंग होईल. मला माहीत नाही काय भंग होईल. ते महा कुंभ कुंभकोणी काही भलतंच सांगतात, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यावर निशाणा साधाला.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षण