शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

दामिनी पथकामुळे रोडरोमिओ वठणीवर

By admin | Updated: August 17, 2016 19:06 IST

दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून आजपर्यंत एकूण १५० रोडरोमिओंवर कारवाई केली

ऑनलाइन लोकमत

चाकण, दि. 17 - येथील पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून आजपर्यंत एकूण १५० रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओ चांगलेच वठणीवर आले आहेत. तसेच मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार चाकण पोलीस ठाण्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली. निर्भया पथकात एक पोलीस अधिकारी, दोन महिला पोलीस व दोन पुरुष पोलीस यांचा समावेश असून हे पथक सध्या वेशात टेहळणी करून गस्त घालीत आहेत. मुलींची छेडछाड होणाऱ्या ठिकाणी लक्ष ठेवून साध्या वेशात स्टिंग ऑपरेशन करून कारवाई करीत आहे, त्यासाठी कॅमेरा व व्हॉइस रेकॉर्डिंग करून गुन्हे दाखल करण्यात येत आहे व यापूढेही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. निर्भया पथकातील नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. मुलाचे स्टिंग ऑपरेशन करून त्याच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या मुलाचा प्रताप त्यांना दाखविण्यात येत आहे. तसेच विवाहित पुरुष असल्यास त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावून आपल्या नवऱ्याचा प्रताप दाखविण्यात येत असल्याने छेडछाड करणाऱ्यांवर चांगलाच वचक बसला आहे. एखादी महिला तक्रार देण्यास पुढे येत नसेल तर महिला पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे गिरीगोसावी यांनी सांगितले. महाविद्यालय परिसर, एस टी बस स्थानक, बाजारपेठ व रस्त्यावर, नो पार्किंग मध्ये आदी ठिकाणी बेशिस्त पणे गाड्या लावणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी स्कॉड मधील महिला पोलीस योगिनी मोरे, पुष्पलता जाधव, तृप्ती गायकवाड, मनीषा मोरे, सुप्रिया गायकवाड यांनी परिसरात बेधडक कारवाई केल्याने नागरिकांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यामुळे महाविद्यालयीन मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. अशा कारवाई मध्ये पोलिसांनी सातत्य ठेवल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. याबाबत लोकमतने एस टी बस स्थानकातील अवैध वाहनतळ पार्किंग व रोड रोमिओंबाबत आवाज उठविला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण, उपनिरीक्षक महेश मुंडे, राकेश कदम, श्रीधर जगताप यांनी पोलीस स्टाफ, महिला पोलीस व महिला दक्षता समिती यांच्यासह परिसरातील श्री शिवाजी विद्यामंदिर, कला व वाणिज्य महाविद्यालय, बहुळ येथील सुभाष विद्यालय, कडाचीवाडी येथील पी के टेक्निकल कॅम्पस, कुरुळी येथील भैरवनाथ विद्यालय, खराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय, महाळुंगे येथील श्रीपतीबाबा विद्यालय, वाकी येथील पायस व प्रियदर्शिनी स्कुल, पाईट येथील ज्युनिअर कॉलेज आदी शाळांमध्ये जाऊन पोलीस पथकाने प्रबोधन केले आहे. त्यामुळे मुलीही जागरूक झाल्या आहेत. मुलींना थेट पोलीस ठाण्याचा दूरध्वनी, पथकातील अधिकारी व महिला पोलिसांचे मोबाईल नंबर्स मिळाल्याने अडचणीच्या प्रसंगी थेट संपर्क साधता येत आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव व उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चाकण विभागातील शाळा व महाविद्यालय परिसरात रोड रोमिंओंवर कारवाई सुरु ठेवली असून मुली व महिलांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी वेगवेगळी पथके करून परिसरात नेहमी प्रमाणे मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी सुरु ठेवली आहे. रोड रोमिओंना आळा घालण्यासाठी चाकण पोलिसांनी परिसरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून प्रबोधन केले. तसेच पोलीस ठाण्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी व मुलींच्या छेड छाड वर उपाय योजना यावर मार्गदर्शन करून 'प्रतिसाद ऍप' ची माहिती दिली आहे. लवकरच शाळांमधील तक्रार पेट्याही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.