खिल्ली उडवणाऱ्या ‘डें’ची पोलिसांनी काढली शोभा

By Admin | Updated: February 23, 2017 07:02 IST2017-02-23T07:02:47+5:302017-02-23T07:02:47+5:30

लेखिका शोभा डे यांनी मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणारे टिष्ट्वट बुधवारी

The Dona police have ridiculed Shobha | खिल्ली उडवणाऱ्या ‘डें’ची पोलिसांनी काढली शोभा

खिल्ली उडवणाऱ्या ‘डें’ची पोलिसांनी काढली शोभा

मुंबई : लेखिका शोभा डे यांनी  मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणारे टिष्ट्वट बुधवारी केले़ मुंबई पोलिसांनी या टिष्ट्वटला ‘जशास तसे’ उत्तर  दिले. त्यावरही शोभा डे यांनी  खोचक असे प्रत्युत्तर दिले. दिवसभर सोशल मीडियावर हा विषय चर्चेत होता.
मंगळवारी मतदान केल्यानंतर शोभा डे यांनी पोट सुटलेल्या एका जाडजूड पोलिसाचा फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला. त्यावर ‘हेवी पोलीस बंदोबस्त’ अशा आशयाच्या मजकुराने पोलिसांची खिल्ली उडवणारे कॅप्शनही टाकले. सोशल मीडियावर हा फोटो काही क्षणातच व्हायरल झाला.  त्यावर चर्चा रंगली, रिप्लाय आले. जवळपास १ हजार २० जणांनी त्याला रिप्लाय केले. ३८० लोकांनी त्यावर रिटिष्ट्वट केले. १ हजार लोकांनी त्याला लाइक केले. या फोटोवरून चर्चा  रंगत असताना, या टिष्ट्वटची  माहिती पोलिसांनी समजली. काहीही संबंध नसलेला फोटो टिष्ट्वट करून  शोभा डे मुंबई पोलिसांची  बदनामी केली़ याने संतप्त  झालेल्या पोलीस दलाने त्यांच्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून प्रत्युत्तर दिले व शोभा डेंची बोलतीच बंद केली.  ‘मस्करी करायला आम्हालाही आवडते. फोटोतील पोलीस आमचा नाही. तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकांकडून आम्हाला चांगल्या गोष्टी अपेक्षित आहेत,’ असा टोला मुंबई पोलिसांनी शोभा डे यांना लगावला आहे.  त्यावर शोभा डे यांनी  टिष्ट्वटद्वारेच उत्तर दिले आहे,
‘मुंबई/ महाराष्ट्र पोलीस प्रणाम... कुणाला खिजविण्याचा हेतू  नाही. समाजमध्यमांमध्ये फिरणारा  हा फोटो खरा असेल, तर डायटेशनचा सल्ला जरूर घ्यावा,’ अशी  मल्लीनाथी शोभा डे यांनी प्रत्युत्तराच्या टिष्ट्वटद्वारे केली आहे.  (प्रतिनिधी)

Web Title: The Dona police have ridiculed Shobha