तांत्रिक बिघाडामुळे डोंबिवलीत विजेचा लपंडाव

By Admin | Updated: June 9, 2016 04:28 IST2016-06-09T04:28:34+5:302016-06-09T04:28:34+5:30

वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जुना आयरे रस्ता, राजाजी पथ गल्ली नं. १ आणि गल्ली नं. २ येथील परिसरात सलग दोन दिवस विजेचा लपंडाव सुरू होता.

Dombivli Power Scandal due to Technical Dilemma | तांत्रिक बिघाडामुळे डोंबिवलीत विजेचा लपंडाव

तांत्रिक बिघाडामुळे डोंबिवलीत विजेचा लपंडाव


कल्याण : डोंबिवली पूर्वेकडील रामनगर फिडरवरील वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जुना आयरे रस्ता, राजाजी पथ गल्ली नं. १ आणि गल्ली नं. २ येथील परिसरात सलग दोन दिवस विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे आणखी हाल झाले.
रामनगर फिडरवर तीन ठिकाणच्या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी सायंकाळी वीज गेली होती. मंगळवारी रात्री उशिरा काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, तो पुन्हा पहाटे खंडित झाला. यामुळे तातडीने तीन ठिकाणच्या वाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या. या कालावधीत इतर ठिकाणच्या वाहिन्यांवरील दबाव कमी होण्यासाठी घरातील वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवावी, असे आवाहन मनसेचे नगरसेवक मंदार हळबे यांनी केले आहे.
सध्या दोन ट्रान्सफॉर्मर आहेत. परंतु, त्यावरील विजेचा दबाव पाहता आणखी दोन ट्रान्सफॉर्मर बसवावे लागणार आहेत. यासंदर्भात दोन दिवसांत ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल, अशी माहिती हळबे यांनी दिली.

Web Title: Dombivli Power Scandal due to Technical Dilemma