शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 06:53 IST

Dombivli Politics: डोंबिवलीत मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने जाळे टाकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: शिंदेसेनेतून भाजपमध्ये घरवापसी झालेले माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे यांच्यामुळे पाथर्ली, गोग्रासवाडी येथील शिंदेसेनेचे हमखास विजयाची खात्री असलेले पॅनल संपुष्टात आल्याने तेथे आता भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे त्या परिसरातील मनसेचे नेते व माजी नगरसेवक मनोज घरत, मंदा पाटील  यांच्यासाठी शिंदेसेनेने जाळे फेकल्याची जोरदार चर्चा सुरू  आहे.

या दोघांपैकी एका नगरसेवकाच्या निकटच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, आ. राजेश मोरे यांच्याकडून त्यांच्याशी बुधवारी थेट संपर्क साधण्यात आला असून, शिंदेसेनेत येण्याबाबत विचारणा करण्यात आली. भाजपकडूनही या दोघांना विचारणा झाली आहे. आता त्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, अद्याप त्या दोन्ही माजी नगरसेवकांचा काहीही निर्णय झाला नसल्याने सत्ताधारी पक्षांची ‘वेट अँड वॉच’ भूमिका आहे.

डोंबिवली पश्चिमेतही भाजप, शिंदेसेना सक्रिय

डोंबिवली पश्चिमेला मनसेचे प्रकाश भोईर, सरोज भोईर हे माजी नगरसेवक असून, ते वास्तव्यास असणाऱ्या उमेशनगर भागात भाजप, शिंदेसेनेने राजकीय समीकरणे जुळवण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. भोईर दाम्पत्य काय निर्णय घेते, याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. भोईर दाम्पत्याकरिता दोन्ही पक्षांनी रेड कार्पेट टाकले आहे. मात्र, भोईर हेदेखील राजू पाटील यांना डावलून निर्णय घेतील का, याबाबत उलटसुलट मते व्यक्त होत आहेत.

मनोज घरत, मंदा पाटील हे  राजू पाटील यांचे विश्वासू 

मनोज घरत, मंदा पाटील हे मनसे नेते राजू पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला राजू पाटील हे कुटुंबीयांसमवेत दोन्ही दिवस पूर्णवेळ उपस्थित होते. मंदा या त्यांच्या कुटुंबातील असल्याने पाटील यांना डावलून ते कोणताही निर्णय घेणार नाहीत. तीच स्थिती घरत यांचीही असून ते पाटील यांचे विश्वासू आहेत.

पाटील-चव्हाण हे तर सख्खे शेजारी मित्र 

राजू पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सख्खे शेजारी व मित्र आहेत. पाटील यांना आमदारकीच्या काळात चव्हाण यांनी विकासकामांसाठी १५० कोटींचा निधी दिला होता. त्यामुळे चव्हाण हे पाटील यांचे उरलेसुरले साथीदार फोडतील का, अशी शंका घेतली जाते. पण, मनसेतून नेते शिंदेसेनेत जाणे भाजपला परवडणारे नसल्याने शिंदेसेनेची कोंडी करण्याकरिता भाजप मनसेच्या काही नेत्यांना प्रवेश देईल, असा होरा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Strengthens in Dombivli; Shinde Sena Targets MNS Ex-Corporators!

Web Summary : BJP gains strength in Dombivli after ex-corporators return. Shinde Sena woos MNS leaders Manoj Gharat, Manda Patil, and Prakash Bhoir for political advantage. All eyes are on their decision.
टॅग्स :dombivaliडोंबिवलीPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरे