डोंबिवलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या
By Admin | Updated: January 24, 2017 17:53 IST2017-01-24T15:15:52+5:302017-01-24T17:53:39+5:30
महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आज भर दिवसा हत्या करण्यात आल्याने डोंबिवली हादरली.

डोंबिवलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 24 - महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भर दुपारी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याने डोंबिवली हादरली. डोंबिवली पूर्व परिसरातील साऊथ इंडियन महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आज दुपारी अडीचच्या सुमारास महाविद्यालयाबाहेरच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रणय सुरेश मोरे (20) असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो डोंबिवली पश्चिमेतील राहणारा आहे. दोघा हल्लेखोरांनी प्रणयवर धारदार शस्त्रांनी वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले असून, त्यातील एकाची ओळख पटली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.