डोंबिवलीत भाजपा - मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा
By Admin | Updated: November 1, 2015 19:12 IST2015-11-01T19:12:02+5:302015-11-01T19:12:02+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवशीही मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना समोर आली.

डोंबिवलीत भाजपा - मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १ - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवशीही मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना समोर आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे कार्यकर्ते नितीन पालन यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून हल्ल्यात चाकू, तलवारीचा वापर झाल्याचे समजते.
डोंबिवली प्रभाग क्रमांक ७४ पाथर्ली गावठाण येथे मनसेच्या उमेदवार मंदा पाटील यांचे पती सुभाष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्ते नितीन पालन यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पालन जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहे. या हाणामारीच्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुभाष पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपाच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांनीच आमच्यावर हल्ल्याचा कट रचला होता. या कार्यकर्त्यांना रोखताना हाणामारी झाली असा दावाही त्यांनी केला.